महिलांच्या पार्सलमध्ये साडेतीन कोटी; सतर्कतेमुळे डाव फसला, दुबई विमानतळावर नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 12:49 IST2025-02-25T12:48:34+5:302025-02-25T12:49:07+5:30

४ लाख १०० डॉलर्स म्हणजेच साडेतीन कोटी रुपये तीन महिलांच्या माध्यमातून दुबईला पाठवले गेले, त्या पैशाबाबत महिला अनभिज्ञ होत्या

mahailaancayaa-paarasalamadhayae-saadaetaina-kaotai-satarakataemaulae-daava-phasalaa-daubai-vaimaanatalaavara-naemakan-kaaya-ghadalan | महिलांच्या पार्सलमध्ये साडेतीन कोटी; सतर्कतेमुळे डाव फसला, दुबई विमानतळावर नेमकं काय घडलं?

महिलांच्या पार्सलमध्ये साडेतीन कोटी; सतर्कतेमुळे डाव फसला, दुबई विमानतळावर नेमकं काय घडलं?

पुणे: हवालाचे पैसे विमानातून दुबईला पाठवल्याप्रकरणी सीमा शुल्क विभागाने दोघांना अटक केली आहे. तीन महिलांकडे पार्सलच्या माध्यमातून हे पैसे देण्यात आले होते. दुबई विमानतळ प्रशासनाच्या सतर्कतेमुळे त्यांचा डाव फसला आणि ते कस्टम विभागाच्या जाळ्यात अडकले. ‘कस्टम’ने ४ लाख १०० डॉलर्स म्हणजेच साडेतीन कोटी रुपये जप्त केले. याप्रकरणी खुशबू अग्रवाल आणि मोहम्मद आमिर यांना अटक करण्यात आली आहे.

४ लाख १०० डॉलर्स म्हणजेच साडेतीन कोटी रुपये तीन महिलांच्या माध्यमातून दुबईला पाठवले गेले. या पैशांबाबत त्या महिला अनभिज्ञ होत्या. दुबई येथील एअरपोर्टवर पोहोचल्या तेव्हा त्या पकडल्या गेल्या. त्यांच्याकडे तेथील विमानतळ यंत्रणेने हिशेब मागितला; परंतु त्यांना याबाबत काहीही सांगता आले नाही. त्यामुळे दुबई विमानतळ प्रशासनाने त्यांना पुन्हा पुणे विमानतळावर पाठवले. पुणे विमानतळावर तिघी उतरल्यानंतर त्यांच्याकडे कस्टमच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर संबंधित पार्सल हे खुशबू अग्रवाल हिने दिल्याचे पुढे आले. तसेच खुशबू आमची विमानतळाच्या बाहेर वाट बघत असल्याचे देखील त्या महिलांनी सांगितले. त्यानंतर कस्टम विभागाने खुशबू अग्रवालला बेड्या ठोकल्या. तिच्याकडे केलेल्या चौकशीत मोहम्मद आमिर याचे नाव समोर आले. तिने ‘सेवन स्काय टूर’चा कर्मचारी आमिर याच्याकडून हे अमेरिकी डॉलर एक्स्चेंज केल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर मोहम्मद आमिर याच्या मुंबईतील घरी छापा टाकून तब्बल १७ देशांची चलने जप्त करण्यात आली.

Web Title: mahailaancayaa-paarasalamadhayae-saadaetaina-kaotai-satarakataemaulae-daava-phasalaa-daubai-vaimaanatalaavara-naemakan-kaaya-ghadalan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.