भारत गौरव रेल्वेतर्फे दुसऱ्यांदा ‘महाकालेश्वर, उत्तर भारत देवभूमी यात्रा’; पुण्यातून सुटणार रेल्वे

By नितीश गोवंडे | Published: May 29, 2023 04:58 PM2023-05-29T16:58:19+5:302023-05-29T16:58:28+5:30

रेल्वे २६ जून ते १ जुलै या कालावधीत पुणे ते उज्जैन- आग्रा- मथुरा- हरिद्वार- ऋषिकेश- अमृतसर- वैष्णोदेवी ते परत पुणे अशी यात्रा करणार

Mahakaleshwar Uttar Bharat Devbhumi Yatra for the second time by Bharat Gaurav Railway The train will leave from Pune | भारत गौरव रेल्वेतर्फे दुसऱ्यांदा ‘महाकालेश्वर, उत्तर भारत देवभूमी यात्रा’; पुण्यातून सुटणार रेल्वे

भारत गौरव रेल्वेतर्फे दुसऱ्यांदा ‘महाकालेश्वर, उत्तर भारत देवभूमी यात्रा’; पुण्यातून सुटणार रेल्वे

googlenewsNext

पुणे : देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ आणि ‘देखो अपना देश’ या उपक्रमांच्या अनुषंगाने  भारत गौरव रेल्वे चालवण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून पर्यटकांच्या आग्रहास्तव दुसऱ्यांना पुण्याहून ‘महाकालेश्वर, उत्तर भारत देवभूमी यात्रा’ रेल्वे येत्या २६ जून रोजी सुटणार आहे. ही रेल्वे २६ जून ते १ जुलै या कालावधीत पुणे ते उज्जैन- आग्रा- मथुरा- हरिद्वार- ऋषिकेश- अमृतसर- वैष्णोदेवी ते परत पुणे अशी यात्रा करणार आहे.

या यात्रे दरम्यान पर्यटकांना ओंकारेश्वर मंदिर, महाकालेश्वर मंदिर, ताजमहाल, कृष्ण जन्मभूमी, ऋषिकेश (गंगा आरतीसह), सुवर्ण मंदिर, वाघा बॉर्डर आणि माता वैष्णोदेवी मंदिर पाहता येणार आहे. अधिक माहिती संकेतस्थळ www.irctctourism.com वर उपलब्ध आहे.

प्रतिव्यक्ती दर..

- स्लीपर क्लास - १६ हजार ३००
- वातानुकूलित तृतीय श्रेणी - २८ हजार ६००
- वातानुकूलित द्वितीय श्रेणी - ३४ हजार २००

‘भारत गौरव’ रेल्वेत या सुविधा मिळणार..

- स्थानिक स्थळांची माहिती मिळणार
- सोबतीला गाइड असणार
- मुक्कामाच्या ठिकाणी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था
- रेल्वेतच जेवणाची व्यवस्था
- हॉटेल ते रेल्वे स्थानक आणि हॉटेल ते स्थानिक स्थळांसाठी वाहनाची सोय
- पॅकेजमध्येच या सर्व बाबींचे शुल्क आकारले असल्याने, प्रवाशांना वेगळे शुल्क देण्याची गरज नाही

Web Title: Mahakaleshwar Uttar Bharat Devbhumi Yatra for the second time by Bharat Gaurav Railway The train will leave from Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.