महाकवी कालिदास जयंती सोहळा
By admin | Published: June 28, 2017 04:20 AM2017-06-28T04:20:28+5:302017-06-28T04:20:28+5:30
कालिदास जयंतीनिमित्त महाकवी कालिदास प्रतिष्ठान धायरी या संस्थेतर्फे महाराष्ट्रातील नामवंत ३५ कवींचे व महाकवी कालिदासाच्या वाङ्मयावर
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कालिदास जयंतीनिमित्त महाकवी कालिदास प्रतिष्ठान धायरी या संस्थेतर्फे महाराष्ट्रातील नामवंत ३५ कवींचे व महाकवी कालिदासाच्या वाङ्मयावर अभ्यासपूर्ण असे निवडक ७ निबंधांचे वाचन करण्यात आले. त्या सर्वांना ज्ञानेश्वर माउलींची प्रतिमा, महेंद्र पाटोदिया यांनी लिहिलेल्या ‘जीवन के झरोके’ या पुस्तकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सोहळ्याचे उद्घाटक लेखक व उद्योगपती महेंद्र पाटोदिया, अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी आणि प्रमुख पाहुणे प्रा. श्याम भुर्के होते. संस्थेचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष साहित्यिक वि. ग. सातपुते यांनी आपल्या मनोगतात संस्थेची स्थापना व उद्दिष्टे व ध्येय व्यक्त करून मान्यवरांचे सत्कार केले. कार्याध्यक्ष काकासाहेब चव्हाण यांनीही आपले मनोगत केले. सर्व मान्यवरांनी आपल्या शैलीत कालिदासाचे मार्मिक अन् उद्बोधक वक्तव्य केले. संस्थेतर्फे महेंद्र पाटोदिया व प्रा. शाम भुर्के यांचा पुणेरी पगडी प्रदान करून सत्कार करण्यात आला.
या समारंभात डॉ. महेंद्र ठाकूरदास, विजय हेर्लेकर, बसवेश्वर हिरेमठ, सुनील खंडेलवाल, वैशाली संगमनेरकर, कल्पलता गोडबोले, चं. गो. भालेराव, कृष्णकांत चेके आदी मान्यवरांचे सहकार्य लाभले.