विश्रांतवाडीत साकारणार महामानव डॉ. आंबेडकरांचा पुतळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 07:22 PM2018-05-03T19:22:44+5:302018-05-03T19:22:44+5:30
आळंदी रस्त्यावरील या मुख्य चौकात नियोजित ग्रेडसेपरेटर व फ्लायओव्हर देखील राज्य शासनाकडून मान्यता मिळाली असून याच कामांमध्ये दर्शनी भागात महामानव डॉ.आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात येणार आहे.
विमाननगर: गेल्या अनेक वर्षांपासून या मुख्य चौकात महामानव डॉ. आंबेडकरांचा पुतळा बसवावा, अशी मागणी तमाम आंबेडकरी अनुयायांकडून केली जात होती. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ जयंतीनिमित्त याबाबतचा ठराव पुतळा समितीच्या वतीने करण्यात आला. विश्रांतवाडी परिसर आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या ठिकाणाला ऐतिहासिक ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील लाभलेल्या मुकुंदराव आंबेडकर चौकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा साकारण्यात येणार असल्याची माहिती उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी दिली आहे.
विश्रांतवाडी परिसरातील तमाम आंबेडकरी जनता व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीने डॉ. धेंडे यांनी याबाबत महापौर मुक्ता टिळक यांना याबाबतचे लेखी निवेदन करून ही मागणी केली आहे. या भागाला डॉ.आंबेडकरांचे पुत्र मुकुंदराव आंबेडकर यांनी देऊन धम्म दीक्षा समारंभाचे आयोजन केले होते. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे वतीने यापूर्वीच विश्रांतवाडीतील मुख्य चौकास मुकुंदराव आंबेडकर चौक असे नामकरण करण्यात आलेले आहे.विश्रांतवाडी परिसरात या मुख्य चौकात डॉ. आंबेडकर जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. आळंदी रस्त्यावरील या मुख्य चौकात नियोजित ग्रेडसेपरेटर व फ्लायओव्हर देखील राज्य शासनाकडून मान्यता मिळाली असून याच कामांमध्ये दर्शनी भागात महामानव डॉ.आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. याबाबत सर्व प्रकारच्या परवानग्यांसाठी पोलीस प्रशासनाकडून सुद्धा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे यावेळी धेंडे यांनी सांगितले.
याबाबतचा ठराव पक्षनेत्यांच्या बैठकीत संमत करून मुख्य सभेने मान्यता दिल्यानंतर विश्रांतवाडी मुख्य चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे.