आषाढी वारीनिमित्त थोरल्या पादुका मंदिरात महापूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:07 AM2021-07-05T04:07:52+5:302021-07-05T04:07:52+5:30
गतवर्षीप्रमाणे यंदाही पालखी सोहळ्यावर कोरोना महामारीचे सावट असल्याने माऊलींच्या पादुका पालखी वारीनिमित्त पंढरपूरला बसने नेण्यात येणार आहे. संत श्री ...
गतवर्षीप्रमाणे यंदाही पालखी सोहळ्यावर कोरोना महामारीचे सावट असल्याने माऊलींच्या पादुका पालखी वारीनिमित्त पंढरपूरला बसने नेण्यात येणार आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात विसावा घेऊन संत श्रींच्या वैभवी पादुकांची महापूजा हरिनाम गजरात परंपरेनुसार केली जाते. मात्र, या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माऊलींच्या चल पादुका एसटी बसने पंढरपूरला नेण्यात येणार आहेत. परंपरा खंडित होऊ नये म्हणून थोरल्या पादुका मंदिरात ट्रस्टच्या वतीने सालाबादप्रमाणे श्रींची प्रतीकात्मक पूजा ट्रस्टच्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी ह.भ.प. रमेश घोंगडे, ह.भ.प. पप्पू ब्रम्हे, ह.भ.प. बाबूलाल तापकीर, सखाराम तापकीर, सुशीला तापकीर, संगीता काळजे आदी भाविक उपस्थित होते.
माऊलींच्या थोरल्या पादुका मंदिरात महापूजा करताना मान्यवर.