Pandharpur Wari 2021: विठूनामाच्या जयघोषात मानाच्या १० पालख्यांचे उद्या ‘शिवशाही’ तून वाखरी तळाकडे प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 04:04 PM2021-07-18T16:04:23+5:302021-07-18T16:04:30+5:30

प्रत्येकी दोन याप्रमाणे १० पालख्यांसाठी २० शिवशाही बसेस सज्ज झाल्या असून या पालख्या वाखरी तळापासून पुढे पायी दिंडीने पंढरपूरला जाणार आहे.

Maharashtra 10 Sant palakhi go to Wakhri tomorrow in Shivshahi bus | Pandharpur Wari 2021: विठूनामाच्या जयघोषात मानाच्या १० पालख्यांचे उद्या ‘शिवशाही’ तून वाखरी तळाकडे प्रस्थान

Pandharpur Wari 2021: विठूनामाच्या जयघोषात मानाच्या १० पालख्यांचे उद्या ‘शिवशाही’ तून वाखरी तळाकडे प्रस्थान

googlenewsNext
ठळक मुद्देआषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्यातील १० मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा राज्य सरकारचा निर्णय

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत सोमवार (दि. १९) रोजी राज्यातील १० मानाच्या पालख्यांचे एसटी महामंडळाच्या ताफ्यातील शिवशाही बसमधून पंढरपूरकडे (वाखरी तळापर्यंत) प्रस्थान होणार आहे. प्रत्येकी दोन याप्रमाणे १० पालख्यांसाठी २० शिवशाही बसेस सज्ज झाल्या आहेत. या पालख्या वाखरी तळापासून पुढे पायी दिंडीने पंढरपूरला जाणार आहे.

आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी पंढरपूरची ओढ लागलेली असते. हरिभक्तीत दंग होऊन, विठूनामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन पायी श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. मात्र, वारी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे सावट कायम आहे. आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील १० मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. या पालखी सोहळ्यासाठी एसटी महामंडळाने मोफत शिवशाही बस दिल्या आहेत. तो मान एसटी महामंडळाला मिळाल्याबद्दल परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी समाधान आणि आनंद व्यक्त केले आहे. 

मंगळवार (दि. १९) रोजी या बसेस पालख्यांसोबत पंढरपूरकडे रवाना होतील. या बसेस विविध आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहेत. पालख्यांचा मूळ ठिकाणापासून पंढरपूर येथील वाखरीपर्यंतचा प्रवास शिवशाही बसमधून होणार आहे. 

राज्यातील या आहेत मानाच्या १० पालख्या

-  संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी )
 - संत तुकाराम महाराज ( देहू )
- संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर )
- संत सोपान काका महाराज ( सासवड )
-  संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर )
- संत नामदेव महाराज ( पंढरपूर )
- संत एकनाथ महाराज ( पैठण )
- रुक्मिणी माता ( कौडानेपूर -अमरावती )
- संत निळोबाराय ( पिंपळनेर – पारनेर अहमदनगर )
-  संत चांगाटेश्वर महाराज ( सासवड )

Web Title: Maharashtra 10 Sant palakhi go to Wakhri tomorrow in Shivshahi bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.