Maharashtra Assembly Election 2024: डिपॉझिट जप्तीत दिग्गजांचा समावेश; पुण्यात ३०३ उमेदवारांपैकी तब्बल २५९ जणांचे डिपॉझिट जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 11:46 AM2024-11-26T11:46:39+5:302024-11-26T11:47:24+5:30

पुण्यात मनसेच्या चारही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असून एक वंचित आणि अपक्ष उमेदवाराचा यात समावेश आहे

Maharashtra Assembly Election 2024 Deposits of 259 out of 303 candidates seized in Pune | Maharashtra Assembly Election 2024: डिपॉझिट जप्तीत दिग्गजांचा समावेश; पुण्यात ३०३ उमेदवारांपैकी तब्बल २५९ जणांचे डिपॉझिट जप्त

Maharashtra Assembly Election 2024: डिपॉझिट जप्तीत दिग्गजांचा समावेश; पुण्यात ३०३ उमेदवारांपैकी तब्बल २५९ जणांचे डिपॉझिट जप्त

पुणे : विधानसभा निवडणुकीत २१ मतदारसंघांत रिंगणात असलेल्या एकूण ३०३ उमेदवारांपैकी तब्बल २५९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. वैध मतांच्या एकषष्ठांशही मते मिळवू न शकणाऱ्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते. ४४ उमेदवारांचे डिपॉझिट वाचले. त्यात २१आमदार व त्यांचे प्रतिस्पर्धी २१ उमेदवार व अन्य दोघांचेच डिपॉझिट वाचले आहे. लोकप्रतिनिधी कायदा १९५१ नुसार संसदीय किंवा विधानसभानिवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे ठराविक रक्कम अनामत रक्कम म्हणून जमा करणे बंधनकारक असते. निवडणुकीत एकषष्ठांश मते घ्यावी लागतात. मतदारसंघात निवडणुकीत तरच डिपॉझिट म्हणून भरलेली रक्कम परत मिळते.

२५९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त 

जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांमध्ये ३०३ उमेदवार उभे होते त्यापैकी २१ उमेदवार आमदार म्हणून निवडून आले तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना एकषष्ठांशपेक्षा जास्त मते मिळाली. तर आणखी दोन उमेदवारांचे मतेएकषष्ठांशपेक्षा जास्त आहेत त्यामुळे अशा एकूण ४४ उमेदवारांचे डिपॉझिट वाचले आहे. तर २५९ उमदेवारांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यांना एकूण मतदानाच्या एकषष्ठांश मतेही मिळाली नाहीत.

डिपॉझिट जप्त या दिग्गजांचा समावेश 

इंदापूर मतदारसंघात अपक्ष उमेदवार प्रविन माने यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. मनसेच्या चारही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहेे. त्यात कोथरुड मतदारसंघातील मनसेचे उमेदवार किशोर शिंदे, खडकवासला मतदारसंघातील उमेदवार मयुरेश वांजळे, कोथरुडचे गणेश भोकर आणि हडपसरचे साईनाथ बाबर यांचा समावेश आहे. याच बरोबर पर्वती मतदासंघातील अपक्ष उमेदवार आबा बागूल, वंचितचे निलेश आल्हाट यांचा समावेश आहे. पुरंदरचेे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संभाजी झेंडे यांचे थोडक्यात डिपॉझिट वाचले आहे.

२१ मतदारसंघांत ३०३ उमेदवार

जिल्ह्यातील २१ मतदारसंघांत ३०३ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. 

संवर्गनिहाय जमा केले जाते डिपॉझिट 

सर्वसाधारण: १० हजार रुपये अनुसूचित जाती : ५ हजार रुपये अनुसूचित जमाती : ५ हजार रुपये

कोणत्या मतदारसंघात किती जणांचे डिपॉझिट जप्त ? 

जुन्नर : ८, आंबेगाव : ९, खेड आळंदी : ११, शिरूर : ९, दौंड : १२, इंदापूर : २२, बारामती : २१, पुरंदर : १३, भोर : ४
मावळ : ४, चिंचवड : १९, पिंपरी : १३, भोसरी : ९, वडगाव शेरी : १४, शिवाजीनगर : ११, कोथरूड : १०, खडकवासला : १२, पर्वती : १३, हडपसर : १७, पुणे कॅन्टोन्मेंट : १८, कसबा पेठ : १० -  एकूण २५९

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Deposits of 259 out of 303 candidates seized in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.