बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 06:48 PM2024-10-24T18:48:53+5:302024-10-24T18:49:54+5:30

Baramati Vidhan Sabha: युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आल्याने बारामतीत आता काका विरुद्ध पुतण्या असा सामना रंगणार, हे स्पष्ट झालं आहे.

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Baramati will have a high voltage match Yugendra Pawars candidature from Sharad Pawars party | बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!

बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!

NCP Sharad Pawar Candidate List ( Marathi News ) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आज अखेर आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केलेल्या ४५ उमेदवारांच्या या यादीत सर्वांत लक्षवेधी नाव आहे ते बारामती विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराचे. बारामतीतूनशरद पवारांच्या राष्ट्रवादीने युगेंद्र पवार यांना उमेदवारी  जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडून स्वत: अजित पवार हे बारामती मतदारसंघातून मैदानात असताना आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आल्याने बारामतीत आता काका विरुद्ध पुतण्या असा सामना रंगणार, हे स्पष्ट झालं आहे.

लोकसभा निवडणुकीपासून अजित पवारांचे सख्ख्ये पुतणे युगेंद्र पवार हे बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाले होते. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी युगेंद्र यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. या निवडणुकीत बारामती तालुक्यातूनही सुप्रिया सुळे यांना ४८ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाल्याने विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या पक्षात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघात झालेली पवार विरुद्ध पवार राजकीय लढाई चांगलीच चर्चिली गेली. या लढाईचा दुसरा अंक विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.  

पवारांच्या पहिल्या उमेदवार यादीत कोणा-कोणाला स्थान?

इस्लामपूर- जयंत पाटील
काटोल- अनिल देशमुख
घनसावंगी – राजेश टोपे
कराड उत्तर – बाळासाहेब पाटील
मुंबा कळवा – जितेंद्र आव्हाड
कोरेगाव – शशिकांत शिंदे
वसमत – जयप्रकाश दांडेगावकर
जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर
इंदापूर – हर्षवर्धन पाटील
राहूरी – प्राजक्त तनपुरे
शिरुर- अशोक पवार
शिराळा – मानसिंगराव नाईक
विक्रमगड – सुनील भुसारा
कर्जत-जामखेड – रोहित पवार
अहमदपूर – विनायकराव पाटील
सिंदखेड राजा – राजेंद्र शिंगणे
उदगीर – सुधाकर भालेराव
भोकरदन – चंद्रकांत दानवे
तुमसर – चरण वाघमारे
किनवट – प्रदीप नाईक
जिंतूर – विजय भांबळे
केज – पृथ्वीराज साठे
बेलापूर – संदीप नाईक
वडगाव शेरी -बापूसाहेब पठारे
जामनेर – दिलिप खोडपे
मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
मुर्तीजापूर -सम्राट डोंगरदिवे
नागपूर पुर्व – दिनेश्वर पेठे
तिरोडा – रविकांत बोपचे
अहेरी – भाग्यश्री आत्राम
बदनापूर – रुपकुमार चव्हाण
मुरबाड – सुभाष पवार
घाटकोपर (पुर्व) – राखी जाधव
आंबेगाव – देवदत्त निकम
बारामती – युगेंद्र पवार
कोपरगाव – संदीप वर्पे
शेवगाव – प्रताप ढाकणे
पारनेर – राणी लंके
आष्टी- मेहबूब शेख
करमाळा – नारायण पाटील
सोलापूर शहर उत्तर – महेश कोठे
चिपळून- प्रशांत यादव
कागल – समरजीत घाटगे
तासगाव -कवठेमहंकाळ – रोहीत पाटील
हडपसर – प्रशांत जगताप

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Baramati will have a high voltage match Yugendra Pawars candidature from Sharad Pawars party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.