एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 02:44 PM2024-11-02T14:44:59+5:302024-11-02T14:52:26+5:30

राज ठाकरेंच्या आरोपाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp Sharad Pawar slams mns chief Raj Thackeray | एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!

एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!

Sharad Pawar ( Marathi News ) : जातीवाद पसरवत शरद पवार यांनी महाराष्ट्राचं वाटोळं केलं, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. या आरोपाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "एक उदाहरण दाखवा जातीयवाद केल्याचं, ज्यांनी उभ्या आयुष्यात काही केलंच नाही त्यांच्याबद्दल आपण काय भाष्य करायचं? त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. कारण महाराष्ट्रातील जनता शहाणी आहे, संपूर्ण राज्याभरातून त्यांचा मागच्या निवडणुकीत एकच आमदार निवडून दिला होता," असा टोला पवार यांनी लगावला आहे. बारामती येथील पत्रकार परिषदेतील ते बोलते होते.

शरद पवार यांनी राज्यातील महायुती सरकारवरही जोरदार निशाणा साधला. "या सरकारचं वैशिष्ट्य आहे. विमानाने उमेदवारांना एबी फॅार्म पाठवले. पोलीस दलाच्या गाड्यांतून महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवली जात आहे. काही जणांची नावे मी जाहीरपणे सांगणार होतो. मात्र, माहिती देणाऱ्या आधिकाऱ्यांनी त्यांचे नाव जाहीर करू नये अशी गळ घातली आहे," असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला आहे.

दरम्यान, "महाविकास आघाडीतील बंडखोर, नाराज शांत होतील. हरियाणाच्या निवडणुकीचा महाराष्ट्रातील निवडणुकीत काडीचाही परिणाम होणार नाही. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नाने आपण चित्र बदलू शकतो, परिवर्तन घडवू शकतो," असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला आहे.
 

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp Sharad Pawar slams mns chief Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.