अपक्ष आमदार शरद सोनावणेसाठी एकनाथ  शिंदेंनीं थेट हेलिकॉप्टरच पाठवलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2024 08:54 PM2024-11-23T20:54:13+5:302024-11-23T20:55:37+5:30

मुख्यमंत्री  शिंदेंची ताकद वाढली...

maharashtra assembly vidhan sabha election 2024 results eknath shinde directly sent a helicopter for Independent mla sharad sonawane | अपक्ष आमदार शरद सोनावणेसाठी एकनाथ  शिंदेंनीं थेट हेलिकॉप्टरच पाठवलं

अपक्ष आमदार शरद सोनावणेसाठी एकनाथ  शिंदेंनीं थेट हेलिकॉप्टरच पाठवलं

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result:  लोकमत न्यूज नेटवर्क, आळेफाटा : जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार शरद सोनावणे यांचा विजय झाला आहे. त्यांच्यासाठी शनिवारी दुपारीच जुन्नर तालुक्यातील राजुरी गावात एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टर पाठवलं. जुन्नर निवडणुकीचा निकला लागला यात जुन्नर तालुक्यातील अपक्ष उमेदवार शरद सोनावणे निवडून आले. शरद सोनावणे जवळपास ७००० मतांनी निवडून आले. शरद सोनावणे निवडून येणार याची खात्री होताच दुपारी 3 वाजता राजुरी गावात एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासाठी पाठलेले हेलिकॉप्टर दाखल झाले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास  सोनावणे  हेलिकॉप्टरमध्ये बसून मुंबईकडे रवाना झाले. यावेळी स्थानिकांनी एकच गर्दी केली होती.

शरद सोनावणे हे जुन्नर मतदारसंघातून अपक्ष उभे राहिले होते. त्यांच्याविरोधात महायुतीचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार अतुल बेनके विरुद्ध शरद पवार गटाचे सत्यशील शेरकर उभे होते. त्यांनी ७ हजारांची लीड मिळवून विजय मिळवला आहे. शरद सोनावणे हे शिंदे गटात होते. परंतु अतुल बेनकेंना उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला होता. 

दरम्यान, त्यांनी विजय मिळवला आहे. शरद सोनावणे २०१४ साली मनसेमधून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा शिवसेनेची साथ दिली. त्यांनी २०१४ च्या टर्ममध्ये केलेल्या विकासकामांच्या जोरावर मते मागितली होती. मात्र २०१९ मध्ये त्यांचा  आमदार अतुल बेनके यांनी पराभव केला होता.
शरद सोनावणे यांच्यासाठी एकनाथ शिंदेनी हेलिकॉप्टर पाठवल्याने शरद सोनावणे पुन्हा शिंदे गटात जाणार असल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदेंनी अपक्ष उमेदवारासाठी मोठे पाऊल उचलले आहे. अपक्ष उमेदवाराला घेऊन पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आपली ताकद वाढवणार असल्याचे दिसत आहे.

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 results eknath shinde directly sent a helicopter for Independent mla sharad sonawane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.