पुणे जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात मविआत बंडखोरी; कोणत्या मतदारसंघात कसं आहे चित्र?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 11:27 AM2024-11-05T11:27:23+5:302024-11-05T11:28:10+5:30

अधिकृत उमेदवाराविरोधात होणारी बंडखोरी रोखण्यात महाविकास आघाडीला सपशेल अपयश आल्याचे दिसत आहे.

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 There is rebellion in many constituencies of Pune district | पुणे जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात मविआत बंडखोरी; कोणत्या मतदारसंघात कसं आहे चित्र?

पुणे जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात मविआत बंडखोरी; कोणत्या मतदारसंघात कसं आहे चित्र?

Pune Vidhan Sabha Election ( Marathi News ) : विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होत आहे. महायुतीत भाजप, शिवसेनेचा शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे; तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांचा समावेश आहे. कोथरूड मतदारसंघामध्ये महायुतीकडून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्याने माजी नगरसेवक अमोल बालवडकर आणि माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर हे उमेदवारी अर्ज भरणार होते. मात्र, त्यांची बंडखोरी शमविण्यात भाजप नेत्यांना यश आले आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून भाजपचे भरत वैरागे आणि खडकवासला मतदारसंघात भाजपचे माजी आमदार शरद ढमाले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. महायुतीकडून पर्वती मतदारसंघातून भाजपच्या माधुरी मिसाळ यांना उमेदवारी दिल्याने माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले हे नाराज झाले होते. त्यामुळे ते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार होते; पण भिमाले यांनी अखेर माघार घेतली आहे. त्यामुळे भाजपला या मतदारसंघात बंडखोरी रोखण्यात यश आले आहे, सध्या असे राजकीय चित्र दिसते.

मैत्रीपूर्ण लढत टाळण्यात यश

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील टिंगरे, तर खडकवासला विधानसभा मतदारसंघात महायुतीतील भाजपचे भीमराव तापकीर रिंगणात आहेत. वडगावशेरी मतदारसंघात भाजपचे जगदीश मुळीक, तर खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दत्तात्रय धनकवडे हे उमेदवारी अर्ज भरण्यास आले होते. या दोघांनाही पक्षाकडून अधिकृतपणे एबी फॉर्म देखील पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून भाजपचे भरत वैरागे आणि खडकवासला मतदारसंघात भाजपचे माजी आमदार शरद ढमाले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. महायुतीकडून पर्वती मतदारसंघातून भाजपच्या माधुरी मिसाळ यांना उमेदवारी दिल्याने माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले हे नाराज झाले होते. त्यामुळे ते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार होते; पण भिमाले यांनी अखेर माघार घेतली आहे. त्यामुळे भाजपला या मतदारसंघात बंडखोरी रोखण्यात यश आले आहे, सध्या असे राजकीय चित्र दिसते. देण्यात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुळीक यांना, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धनकवडे यांना आदेश आला आणि या दोघानीही अर्ज भरले नाहीत.

तीन मतदारसंघांत मविआचे बंडखोर उमेदवार 

- अधिकृत उमेदवाराविरोधात होणारी बंडखोरी रोखण्यात महाविकास आघाडीला सपशेल अपयश आल्याचे दिसत आहे. पुण्यात काँग्रेसमध्ये कसबा, शिवाजीनगर आणि पर्वती अशा तीन मतदारसंघांत आघाडीमध्ये बंडखोरी झाली असून, जिल्ह्यातही काही ठिकाणी आघाडीमध्ये बंडखोरी झाली आहे. 

- इंदापूर, पुरंदर, भोर या मतदारसंघांमध्ये आघाडीच्या अधिकृत उमदेवाराविरुद्ध आघाडीचेच पदाधिकारी अपक्ष म्हणून उभे आहेत. पिंपरी-चिंचवडमधील ४ मतदारसंघांत मात्र आघाडीत बंडखोरी झालेली नाही. तिथे मावळ मतदारसंघात आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार उभा आहे. पुणे शहरात कसबा, शिवाजीनगर, पर्वती या मतदारसंघांमध्ये आघाडीत बंडखोरी झाली आहे. यात दोन ठिकाणी तर काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केली आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमदेवाराने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात उमेदवारी अर्ज कायम ठेवला.

चर्चेनंतरही उमेदवारी अर्ज कायम 

बंडखोरी मिटवण्यामध्ये सुरुवातीलाच असे अपयश आल्याने आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते अखेरपर्यंत बंडखोरांची मनधरणी करत होते. काही उमेदवारांसंदर्भात त्यांना यश आले. मात्र, काही ठिकाणी पक्षाच्या राज्यस्तरावरील नेत्यांनी मोबाइलवरून चर्चा केल्यानंतरही बंडखोरांनी उमेदवारी अर्ज कायमच ठेवला.

शिस्तभंगाची होणार कारवाई 

- बंडखोरांवर पक्षाच्या वतीने शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे नेत्यांनी सांगितले. यात त्यांना पक्षातून विशिष्ट कालावधीसाठी निलंबितदेखील केले जाईल. पक्षाच्या राज्यस्तरावरील नेत्यांबरोबर यासंदर्भात चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी दिली. 

दरम्यान, आघाडीच्या वतीने प्रचाराचे नियोजन केले जात आहे. जाहीर प्रचाराचा कालावधी फक्त १४ दिवसांचा आहे. एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांच्या फिरण्यावर, सभा घेण्यावर बंधने येणार आहेत, तरीही जिल्ह्यात तीनही पक्षांचे स्टार प्रचारक येण्याची शक्यता होती.
 

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 There is rebellion in many constituencies of Pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.