Maharashtra Bandh : पुणे ते अाैरंगाबाद एसटीसेवा बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 03:30 PM2018-07-24T15:30:02+5:302018-07-24T15:31:32+5:30
काकासाहेब शिंदे या तरुणाने मराठा समाजाला अारक्षण मिळावे या मागणीसाठी साेमवारी अात्महत्या केल्याने अाज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात अाली अाहे. त्यामुळे पुणे ते अाैरंगाबाद एसटी सेवा बंद ठेवण्यात अाली अाहे.
पुणे : मराठा समाजाला अारक्षण मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी अांदाेलने करण्यात येत अाहेत. साेमवारी औरंगाबाद मधील अांदाेलक तरुण काकासाहेब शिंदे याने अारक्षणासाठी घाेषणाबाजी करत गाेदावरी नदीत उडी मारली. पाेहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. या पार्श्वभूमिवर अाज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात अाली हाेती.या बंद मधून सातारा, साेलापूर, पुणे , मुंबईला वगळण्यात अाले अाहे. अाैरंगाबाद, अहमदनगर या ठिकाणी जाेरदार निदर्शने चालू असल्याने त्याचा परिणाम एसटी वाहतूकीवर झाला अाहे. पुण्यातून अाैरंगाबादला जाणाऱ्या एसटी बसेस अाज सकाळ पासूनच रद्द करण्यात अाल्या अाहेत. तर अहमदनगरकडे जाणाऱ्या बसेस या अांदाेलनाच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन साेडण्यात येत अाहेत.
मराठा समाजाला अारक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती माेर्चातर्फे ठिकठिकाणी अांदाेलने करण्यात येत अाहेत. साेमवारी काकासाहेब शिंदे या तरुणाने अारक्षण मिळावे या मागणीसाठी नदीत उडी मारुन अात्महत्या केल्याने या अांदाेलनाला वेगळे स्वरुप प्राप्त झाले. काकासाहेब शिंदे याने मराठा अारक्षणाच्या मागणीसाठी बलिदान दिल्याच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात अाली. त्याचा परिणाम एसटी सेवेवर झाल्याचे दिसून अाले. खबरदारी म्हणून पुण्यातील शिवाजीनगर एसटी स्थानकातून अाैरंगाबादकडे जाणाऱ्या एसटी बसेस दुपारपर्यंत रद्द करण्यात अाल्या हाेत्या. तसेच अहमदनगरच्या एसटी बसेस परिस्थीतीचा अंदाज घेऊन साेडण्यात येत अाहेत.
अनेकांना या बंदची माहिती नसल्याने ते एसटी स्थानकावर अडकून पडल्याचे चित्र हाेते. एसटीसेवा कधी सुरु हाेईल याचा अंदाज नसल्याने अनेकांना तासनतास एसटी स्थानकात वाट पाहावी लागली. अाैरंगाबादला निघालेला एक तरुण म्हणाला, मला महाराष्ट्र बंदची हाक दिल्याचे माहिती नव्हते. इथे अाल्यानंतर एसटी बंद असल्याचे कळाले. खासगी बससेवा सुद्धा बंद असल्याने अाज पुण्यातच रहावे लागणार अाहे.