12th Exam : ऑल द बेस्ट! 12वीच्या परीक्षेला उद्यापासून होणार सुरुवात; हॉल तिकीट उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 12:23 PM2020-02-17T12:23:59+5:302020-02-17T12:38:50+5:30

HSC Exam : यंदा राज्यातून एकूण १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी परीक्षेला बसणार असून त्यात८ लाख ४३ हजार ५५२ इतके विद्यार्थी व ६ लाख ६१ हजार ३२५ विद्यार्थिनी यांचा समावेश असणार आहे.

Maharashtra Board HSC / 12th Exam 2020 to begin tomorrow | 12th Exam : ऑल द बेस्ट! 12वीच्या परीक्षेला उद्यापासून होणार सुरुवात; हॉल तिकीट उपलब्ध

12th Exam : ऑल द बेस्ट! 12वीच्या परीक्षेला उद्यापासून होणार सुरुवात; हॉल तिकीट उपलब्ध

Next
ठळक मुद्देबारावीच्या परीक्षेला उद्यापासून (18 फेब्रुवारी) सुरुवात होत आहे. यंदा राज्यातून एकूण १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी परीक्षेला बसणार.राज्यभरात मिळून ९ हजार ९२३ केंद्रांवर या परीक्षा पार पाडणार आहे.

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला उद्यापासून (18 फेब्रुवारी) सुरुवात होत आहे. यंदा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० या कालावधीत परीक्षा होणार असल्याची माहिती अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली. यंदा बारावीला १ फेब्रुवारीला प्रॅक्टिकल परीक्षा सुरू झाली. ती आज म्हणजे १७ फेब्रुवारीला संपणार आहे. यंदा राज्यातून एकूण १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी परीक्षेला बसणार असून त्यात८ लाख ४३ हजार ५५२ इतके विद्यार्थी व ६ लाख ६१ हजार ३२५ विद्यार्थिनी यांचा समावेश असणार आहे. राज्यभरात मिळून ९ हजार ९२३ केंद्रांवर या परीक्षा पार पाडणार आहे.

यंदा ऑनलाईन हॉल तिकीट उपलब्ध करून दिल्याचेही मंडळाचे स्पष्ट होईल. परीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून राज्यभरात मिळून २७३ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. ही पथके 'गैरमार्गाशी लढा' या नावाने काम करणार आहेत. यामध्ये महिलांचे एक विशेष पथक काम करणार आहे. याशिवाय प्रत्येक विभागीय मंडळात हेल्पलाईन तयार करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना, पालकांना येणाऱ्या अडचणींवर त्यावर २४ तास मार्गदर्शन करण्यात येईल. याही वर्षी परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना बंदी आहे तर शिक्षकांचे मोबाईल केंद्रावर एका ठिकाणी ठेवले जाणार आहेत. यामुळे पेपरफुटी प्रकरण नियंत्रण आणण्याचा विचार आहे. याशिवाय प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त असेल.

विद्यार्थ्यांनी पालन करायच्या सूचना 

- विद्यार्थ्यांनी परीक्षेला वेळेवर उपस्थित राहावे.

- सकाळी पेपर असेल तर साडे दहा वाजता तर दुपारी पेपर पेपर असेल तर अडीच वाजता उपस्थितीत राहावे.

- दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षेला  Calculter वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

लष्करातल्या महिला अधिकाऱ्यांना मिळणार कायमस्वरुपी नियुक्ती; मोदी सरकारला 'सर्वोच्च' धक्का

शिवसेना नाणारवरुन यू टर्न घेणार? मुख्यमंत्री कोकणात असूनही आंदोलकांची भेट नाकारणार

हनी ट्रॅप: नौदलाच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला गोपनिय दस्तावेज पुरविले; 11 अटकेत

आता दुसऱ्या राज्यातून अथवा शहरातून करता येणार मतदान

गेली सत्ता अन् आमदारकी, फसला भाजपा नेत्याचा डाव; अखेर सापडला 'चोरीस' गेलेला तलाव

 

 

Web Title: Maharashtra Board HSC / 12th Exam 2020 to begin tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.