प्रजासत्ताक दिनाच्या स्पर्धेत महाराष्ट्र काॅन्टीजन सर्वसाधारण विजेतेपद मिळवणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:28 AM2020-12-15T04:28:40+5:302020-12-15T04:28:40+5:30
दीपक होमकर : पुणे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनासह इतर स्पर्धांमध्ये एनसीसीच्या महाराष्ट्र कॉन्टीजनची टीम नेहमीच चमकदार ...
दीपक होमकर : पुणे
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनासह इतर स्पर्धांमध्ये एनसीसीच्या महाराष्ट्र कॉन्टीजनची टीम नेहमीच चमकदार कामगिरी करत असते. दोन वर्षापूर्वी महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपदासाठी तिसरा क्रमांक पटकाविला होता, गेल्या वर्षी दुसरा क्रमांक पटकाविला होता मात्र यंदा पहिलाच क्रमांक पटकाविण्यासाठीची जिद्द ठेवून तयारी केली असून त्यासाठी महाराष्ट्र कॉन्टीजन सज्ज झाले असल्याची माहिती एनसीसी पुणे ग्रूप कमांडर ब्रिगेडिअर सुनिल लिमये यांनी दिली.
राज्यभरातील सात एनसीसी ग्रूप मधील निवडक ५६ कॅडेट्स गेल्या महिनाभरापासून पुण्यात निवड चाचणी शिबीरासाठी दाखल झाले होते. त्यातील केवळ २६ कॅडेट्सची निवड दिल्लीच्या राजपथ संचनासाठी झाली आहे. हे पथक १८ तारखेला विमानाने दिल्लीला रवाना होणार आहे. त्यानंतर तेथे पंधरा दिवस क्वारंटाईनचा कालावधी संपवून त्यानंतर दिल्लीत महिनाभर सराव शिबीर होऊल व २६ तारखेला राजपथावर संचलन होणार आहे.
देशभरातील विविध राज्यातून येणाऱ्या एनसीसी काॅन्टीजनच्या दिल्लीतच विविध स्पर्धा असतात, त्यामध्ये संचनल, बेस्ट कॅडेट्स (बाईज-गर्ल्स), रायफल शुटींग, सांस्कृतिक दर्शन, फ्लॅग एरिया, गार्ड ऑफ ऑनर, पीएम रॅली अशा विविध स्पर्धा होतात. त्यासाठी महाराष्ट्रातून सुमारे ११६ कॅडेट दिल्लीला जातात मात्र यंदा कोरोना महामारीमुळे यातील बुहतांश स्पर्धा रद्द करण्यात आल्या असून केवळ संचलन, बेस्ट कॅडेट्स या स्पर्धा होणार आहेत. कॅडेटसला कोरनाचा लागण होऊ नये यासाठी प्रचंद खबरदारी घेण्यात येत असून त्यामुळे यंदा एनसीसीच्या इतिहासात प्रथमच विद्यार्थ्यांना विमानाने दिल्लीला नेण्यात येत आहे.
--
राज्यातील विभागनिहाय कॅड्सेट असे
--
पुणे - १०
मुंबई ए - १
मुंबई बी -३
कोल्हापूर -२
नागपूर -५
औरंगाबाद-५
अमरावती -१
--
सोलापूरच्या शेटे व बारामतीचे प्रा. बेले
या अधिकाऱ्यांची निवड
पुण्यामध्ये एनसीसीचे एअर आणि नेव्हल या दोन विंग्स अधिकच्या असल्यामुळे यो दोन्ही विंग्सचे बेस्ट कॅडट्स स्पर्धेसाठी यातील दोन मुले, दोन मुली असे चार कॅड्सची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुण्यातील एकूण कॅड्सची संख्या जास्त आहे. याशिवाय या कॉन्टीजन मध्ये एनसीसी अधिकारी म्हणून पुणे विभागातील कर्नल प्रशांत नायर हे दिल्लीला जाणार आहेत. तर महाविद्यालयीन एनसीसी अधिकारी म्हणून सोलापूरच्या आरुषा शेटे आणि बारामतीचे प्रा. एनीसीसी सोलापूरच्या आरुषा व बारामतीच्या विवेक बेले यांची निवड झाली आहे. २६ कॅडेटसह हे तिनही अधिकारी दिल्लीला रवाना होणार आहेत.
---