Maharashtra | थंडीत आजपासून घट होण्याची शक्यता; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 09:19 AM2023-02-16T09:19:53+5:302023-02-16T09:20:45+5:30

पुणे शहरातही बुधवारी किमान तापमान ८.४ अंश सेल्सिअस इतके होते...

Maharashtra | Chances of reduction in cold from today; Forecast by Meteorological Department | Maharashtra | थंडीत आजपासून घट होण्याची शक्यता; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

Maharashtra | थंडीत आजपासून घट होण्याची शक्यता; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

googlenewsNext

पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा थंडीत वाढ झाली असून, राज्यात निचांकी तापमान जळगाव येथे ८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. मात्र, गुरुवारपासून यात वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. पुणे शहरातही बुधवारी किमान तापमान ८.४ अंश सेल्सिअस इतके होते.

गेल्या तीन दिवसांपासून उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात मोठी घट झाली होती. किमान सरासरी तापमानाच्या तुलनेत जळगाव येथे ४ ते ४.५ अंश सेल्सिअसने तापमान घसरले होते. परिणामी, बुधवारी जळगाव येथे किमान तापमान ८ अंशांपर्यंत आले. त्याचा प्रभाव पुण्यातही दिसून आला.

गेले दोन दिवस पुण्यात किमान तापमान एकअंकी नोंदविले गेले. याबाबत हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ.अनुपम काश्यपी म्हणाले, ‘उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे ही वाढ झाली होती. जळगाव येथे ही थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती होती. मात्र, गुरुवारपासून बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या पूर्वेकडील वाऱ्यांमुळे राज्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे सायंकाळी काहीसे ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी, किमान तापमानात हळूहळू वाढ होण्यास सुरुवात होईल. ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहील.’

याच स्थितीमुळे कमाल तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यातही वाढ हळूहळूच असेल. सध्या राज्यात किमान तापमानात रत्नागिरी वगळता सरासरीच्या २ ते ३ अंशांची वाढ नोंदविण्यात येत आहे. राज्यात बुधवारी सर्वाधिक तापमान सोलापूर येथे ३७.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. रत्नागिरी येथे कमाल तापमान ३७ होते.

Web Title: Maharashtra | Chances of reduction in cold from today; Forecast by Meteorological Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.