बुधवारी महाराष्ट्र बंद; एसटी सज्ज  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 04:24 AM2018-01-03T04:24:47+5:302018-01-03T04:25:00+5:30

भीमा-कोरेगाव प्रकरणी ३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने उपाययोजना केल्या आहेत. यात एसटी बसला जाळ््या बसवाव्यात, बंदचा अंदाज घेऊन पोलिसांच्या परवनागीने एसटी सुरु करा, स्थानकावर प्रथमोपचार सेवा द्यावी, अशा सूचनांचा समावेश आहे.

 Maharashtra closed on Wednesday; ST Ready | बुधवारी महाराष्ट्र बंद; एसटी सज्ज  

बुधवारी महाराष्ट्र बंद; एसटी सज्ज  

Next

मुंबई  - भीमा-कोरेगाव प्रकरणी ३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने उपाययोजना केल्या आहेत. यात एसटी बसला जाळ््या बसवाव्यात, बंदचा अंदाज घेऊन पोलिसांच्या परवनागीने एसटी सुरु करा, स्थानकावर प्रथमोपचार सेवा द्यावी, अशा सूचनांचा समावेश आहे. बंदमुळे फेºया रद्द झाल्यास आरक्षित तिकिटांचा परतावा देण्याची व्यवस्था करावी, असे आदेश राज्यातील सर्व विभागांना देण्यात आले आहेत.
भीमा कोरेगाव घटनेमुळे मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंत राज्यभरात १८७ एसटी बसचे नुकसान झाले. मराठवाडा, विदर्भ या भागात सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती महामंडळाने दिली.
मंगळवारी संघटनांकडून ३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या काळात एसटी प्रशासनाने स्थानक-आगारातील गर्दी पाहून बस चालवण्याचे आदेश देण्यात आले आहे. विभागीय पातळीवर सर्व माहिती निंयत्रण कक्षासह वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांना ‘मेल’ करा, अशा सूचना महामंडळाने परिपत्रकाद्वारे केल्या आहेत.
आंदोलनकर्त्यांचा भावना व्यक्त करण्याचा हक्क आम्हाला जरी मान्य आहे. तथापि त्या व्यक्त करताना सर्वसामान्यांच्या एसटी सेवेला ‘लक्ष्य’ करणे योग्य नाही. याच त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. एसटीचे आर्थिक नुकसानही होते. परिणामी आंदोलकांनी जाळपोळ, दगडफेक रास्तारोको या माध्यमातून एसटीला लक्ष्य करुन त्याची मोडतोड करु नये, असे आवाहन परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केले.

प्रवाशांना अर्ध्या रस्त्यात उतरवले
प्रवाशांपेक्षा महामंडळाला आपल्या बसची अधिक काळजी असल्याची घटना मंगळवारी घडली. पुण्याहून मुंबईकडे आलेल्या एसटीच्या शिवनेरीच्या चालकाने खारघरला पोहोचल्यावर बस पुढे जाणार नाही, येथेच उतरुन घ्या, असे सांगितले. बहुतेक प्रवासी उतरून गेले; मात्र काही प्रवाशांनी आक्षेप घेतला. एसटीच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांना फोन केले; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दुपारी साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रवाशांनी वाद घातल्यानंतर शिवनेरी चालक बस घेऊन वाशी महामार्गापर्यंत सोडण्यास तयार झाला. परिणामी मुंबईपर्यंतचे प्रवासी भाडे अदा करणाºया प्रवाशांना कोणताही परतावा देण्यात आला नाही. हार्बर मार्ग बंद असल्यामुळे प्रवाशांना ठाणे मार्गे मुंबई गाठावे लागले.


आज शाळा सुरू; स्कूल बस बंद!
च्भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद मुंबईत उमटू लागल्याने मंगळवारी बहुतेक शाळांनी सुरक्षेच्या कारणास्तव दुपारीच विद्यार्थ्यांना घरी सोडले. दरम्यान, बुधवारी विविध संघटना व राजकीय पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतरही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शाळा बंद ठेवण्यास नकार दिला आहे. बुधवारी तणावाच्या वातावरणात विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागणार आहे.
च्याबाबत पालकांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षण उपसंचालक बी.बी. चव्हाण यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार जिल्ह्यातील शाळा सुरू राहणार असल्याची माहिती दिली. तावडे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत कोणत्याही प्रकारची सुट्टी जाहीर केले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील सद्यस्थिती पाहता शाळेतील मुलांची सुरक्षितता आणि बसचे रक्षण करण्यासाठी सकाळच्या सत्रात स्कूल बस धावणार नाही. बुधवारी सकाळची परिस्थिती पाहून दुपारच्या सत्रातील स्कूलबस बाबत निर्णय घेण्यात येईल. वैयक्तिक विद्यार्थी वाहतूक करणाºयांनी परिस्थिती पाहून वाहतूकीबाबत निर्णय घ्यावा, अशी माहिती स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली.

Web Title:  Maharashtra closed on Wednesday; ST Ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.