Maharashtra CM : विधानसभेतील बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाची ''नवी '' रणनिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 01:07 PM2019-11-26T13:07:17+5:302019-11-26T13:25:00+5:30
भाजपाचे नेते कधीही अंधारात ऊडी मारत नाहीत, त्यामुळे विजय पक्का आहे
पुणे: भारतीय जनता पक्षाने विधानसभेतील बहुमतासाठी तयारी सुरू केली. जिल्ह्यातील भाजपा आमदारांचे गट करून त्यांच्यातील ज्येष्ठ आमदारांवर त्या गटाची जबाबदारी देण्यात आली आहे. आमदारांचे मनोबल ठेवणे, त्यांना विस्ताराने सगळी माहिती देणे, असे करण्यास त्यांना सांगण्यात आले आहे.पुण्यातील जबाबदारी आमदार माधुरी मिसाळ यांच्यावर आहे. प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील पुण्यातून निवडून आलेले असले तरी त्यांच्यावर मुंबईतील घटनांची जबाबदारी आहे. मिसाळ म्हणाल्या. पुण्यातील मुक्ता टिळक, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनिल कांबळे यांच्याबरोबर बोलणे झाले आहे. सर्वांना आजच संध्याकाळी मुंबईत हजर राहण्यास सांगितले आहे. शपथविधी, मतदान यासंबधी त्यांना सगळी माहिती देण्यात आली आहे. मुक्ता टिळक यांच्या घरी मुलीचा विवाह.समारंभ असल्यामुळे त्या व्यस्त आहेत. त्यामुळे त्या ऊद्या मुंबईत येतील. त्याविषयी चंद्रकांत पाटील यांच्याकडे विचारणा करत आहे. विधानसभेत ऊद्या कोणत्याही स्थितीत भाजपा राष्ट्रवादी यांचे बहुमत सिद्ध होईल. पक्षाचे नेते, त्यातही भाजपाचे नेते कधीही अंधारात ऊडी मारत नाहीत, त्यामुळे विजय पक्का आहे असा विश्वास मिसाळ यांनी व्यक्त केला. आपण मुंबईतच आहोत, भाजपाशी.संबंधित सर्व घटना, घडामोडीमध्ये सक्रीय आहोत असे त्या म्हणाल्या. जिल्ह्यातील भाजपा आमदारांबरोबरही बोलणे होत आहे. तेही मुंबईत यायला निघाले आहेत अशी माहिती मिसाळ यांनी दिली.