Maharashtra Election 2019 : पुण्यात विधानसभेच्या २१ जागांसाठी २४६ उमेदवार : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 12:02 PM2019-10-09T12:02:58+5:302019-10-09T12:06:37+5:30

कॅन्टोन्मेंट, पिंपरीत सर्वाधिक उमेदवारसंख्या

Maharashtra Election 2019 : 246 candidates for 21 seats in the Assembly election in the pune: naval kishor ram | Maharashtra Election 2019 : पुण्यात विधानसभेच्या २१ जागांसाठी २४६ उमेदवार : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Maharashtra Election 2019 : पुण्यात विधानसभेच्या २१ जागांसाठी २४६ उमेदवार : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील २१ जागांसाठी ४४५ उमेदवारांनी ५९५ अर्ज होते नेले पिंपरीतील १३ उमेदवरांनी व कॅन्टोन्मेंटमधील ३० उमेदवारांनी घेतली माघार

पुणे : युती अथवा आघाडी झाल्यामुळे बंडाचे निशाण फडकाविलेल्या अनेकांनी आपले बंड सोमवारी म्यान केले. जिल्ह्यातील तब्बल १२७ जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता २१ जागांसाठी २४६ उमेदवार रिंगणात असतील. जिल्ह्यात कॅन्टोन्मेंटमध्ये सर्वाधिक  २८ उमेदवार असून, खालोखाल पिंपरीमध्ये १८ उमेदवार असतील. याच दोन मतदारसंघांत दोन बॅलेट युनिटची (बीयु) गरज भासणार आहे. भाजपचे चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील, संजय भेगडे, माधुरी मिसाळ, लक्ष्मण जगताप, ‘राष्ट्रवादी’चे अजित पवार, अतुल बेनके, काँग्रेसचे संजय जगताप आदी प्रमुख निवडणूक लढवत आहेत.
सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यातील निवडणूककामांची माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मृणालिनी सावंत यावेळी उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी राम म्हणाले, जिल्ह्यातील २१ जागांसाठी ४४५ उमेदवारांनी ५९५ अर्ज नेले होते. छाननीमध्ये त्यातील ३७३ अर्ज वैध ठरले. वैध उमेदवारांमधील १२७ जणांनी सोमवारी माघार घेतली. त्यामुळे २४६ उमेदवार अंतिम असतील. पिंपरीतील १३ उमेदवरांनी व कॅन्टोन्मेंटमधील ३० उमेदवारांनी माघार घेतली. त्यानंतरही या दोन मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार आहेत. येथे दोन बॅलेट युनिट बसवाव्या लागतील. यंदाच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व मतदान केंदे्र ही तळमजल्यावरच राहतील. त्यासाठी काही मतदान केंद्रांची स्थळेदेखील बदलली आहेत. पोस्टल बॅलेटच्या मतदानाची प्रक्रिया, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठीची प्रसिद्धी, मतदान स्लिपावाटपाचा कार्यक्रम, मतदान आणि मतमोजणीच्या कामाची तयारीदेखील झाली असल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली. 
.........
६० लाखांचे संशयित बँक व्यवहार 
जिल्हा प्रशासनाने बॅँक खात्यातील तब्बल ६० लाखांच्या संशयित व्यवहारांची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली आहे. मद्यासाठी रोख रक्कम असा १ कोटी ३१ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल तपास पथकांनी जप्त केला आहे. त्यात पर्वती मतदारसंघात पकडलेल्या १७ लाख ९७ हजार ४९० रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे. 
......
साडेपाच हजार मतदार बजावणार पोस्टल मतदानाचा हक्क
जिल्ह्यात निवडणूक कामांवर असलेले सरकारी अधिकारी, पोलीस व सैनिक मिळून तब्बल ५,७९५ मतदार हक्क बजावतील. त्यांना मंगळवारी (दि. ८) आॅनलाईन मतपत्रिका पाठविल्या जाणार आहेत. त्या मतपत्रिका डाऊनलोड करून संबंधित मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे संबंधितांना पाठवाव्या लागतील. लोकसभेला ६० टक्के पोस्टल मतदान झाले होते. विधानसभेला शंभर टक्के मतदानाचे उद्दिष्ट आहे.
...........
जिल्ह्यातील ११८७ मतदान केंद्रांमध्ये बदल
जिल्ह्यात २४९ सहायकारी मतदान केंद्रांसह एकूण ७,९१५ मतदान केंदे्र आहेत. सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर असतील. या निवडणुकीसाठी तब्बल १ हजार १८७ मतदान केंदे्र स्थलांतरित करण्यात आली आहेत. चिंचवड व वडगावशेरीतील प्रत्येकी १७५ केंदे्र, पिंपरी १४५, कोथरूड १४१, खडकवासला १४० व हडपसरमधील सर्वाधिक १३६ मतदान केंद्रे बदलण्यात आली आहेत. 
..........
विधानसभानिहाय रिंगणात 
असलेले उमेदवार
    मतदारसंघ    माघार     अंतिम 
        घेतलेली    उमेदवार             संख्या    संख्या
    जुन्नर     १    ११
    आंबेगाव    ३    ६
    खेड-आळंदी    ४    ९
    शिरूर    ५    १०
    दौंड    ४    १३
    इंदापूर    १५    १५
    बारामती    २    १०
    पुरंदर    ५    ११
    भोर    ४    ७
    मावळ    ३    ७
    चिंचवड    ३    ११
    पिंपरी    १३    १८
    भोसरी    ६    १२
    वडगावशेरी    ५    १२
    शिवाजीनगर    ०    १३
    कोथरूड    १०    ११
    खडकवासला    २    ७
    पर्वती    ४    ११
    हडपसर    ५    १४
    पुणे कॅन्टोन्मेंट    ३०    २८
    कसबा पेठ    ३    २१०

Web Title: Maharashtra Election 2019 : 246 candidates for 21 seats in the Assembly election in the pune: naval kishor ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.