Maharashtra Election 2019 : भाजप-सेनेचे कसब्यात मनोमिलन नाहीच?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 02:35 PM2019-10-15T14:35:12+5:302019-10-15T14:37:09+5:30

विधानसभेची शहरातील एकही जागा दिली नसल्यामुळे नाराज झालेल्या शहर शिवसेनेला बरोबर घेणे भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेतृत्वाला अजूनही शक्य झालेले नाही...

Maharashtra Election 2019 : BJP-Sena has nothing mindly attached between in kasba ? | Maharashtra Election 2019 : भाजप-सेनेचे कसब्यात मनोमिलन नाहीच?

Maharashtra Election 2019 : भाजप-सेनेचे कसब्यात मनोमिलन नाहीच?

googlenewsNext
ठळक मुद्दे पर्वती मतदारसंघ वगळता शिवसेना प्रचारातून पूर्ण बाजूला

पुणे : विधानसभेची शहरातील एकही जागा दिली नसल्यामुळे नाराज झालेल्या शहर शिवसेनेला बरोबर घेणे भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेतृत्वाला अजूनही शक्य झालेले नाही. खासदार गिरीश बापट यांनी रिपाइंबरोबर केली तशीच शिष्टाई शिवसेनेबरोबर करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्यातच झालेल्या भांडणामुळे अयशस्वी झाला.
भाजपच्या विरोधातील सगळा रोष आता त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेतील बंडखोर उमेदवार नगरसेवक विशाल धनवडे यांच्याबरोबर एकवटला असल्याचे दिसते आहे. त्यात खुद्द भाजपतील नाराजांचाही समावेश आहे. नेते छुपेपणाने, तर काही शिवसैनिक उघडपणे धनवडे यांच्याबरोबर फिरताना दिसत आहेत. विजयासाठी त्याचा किती उपयोग होतो, यापेक्षाही भाजपच्या उमेदवाराला मतांमध्ये किती फरक पडतो, अशी चर्चा आहे.
भाजपच्या काही मतदारसंघांतील उमेदवारांनी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांना बरोबर घेत त्यांची नाराजी दूर केली आहे. त्यामुळे त्या त्या मतदारसंघात तेथील शिवसेना पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते प्रचारात दिसतात. पर्वती मतदारसंघात हे प्रमाण जास्त आहे. अन्य ठिकाणी मात्र शिवसेना प्रचारातून पूर्ण बाजूला दिसते आहे. शहरप्रमुखपदापासून अचानक बाजूला केलेले माजी आमदार महादेव बाबर यांनी आपण प्रचारात सहभागी होणार नाही, असे जाहीरच केले आहे. 

दुसरे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनीही जवळपास फारकत घेतली आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेले शहरप्रमुख संजय मोरे भाजपच्या नेत्यांबरोबर बैठकांना दिसतात, मात्र प्रचारामध्ये शिवसैनिक दिसायला हवेत त्या प्रमाणात दिसत नाहीत.
...........
शिवसेना बरोबरच आहे
शिवसैनिक कुठेही गेलेले नाहीत. ते भाजपबरोबर प्रचारात आहेत. त्यांनी नाराज होणे स्वाभाविक आहे. मात्र युतीचा निर्णय झाल्यानंतर त्यांनी तो मान्य केला असून स्थानिक नेत्यांबरोबर बैठक, चर्चा असे सगळे काही झाले आहे. त्यांची नाराजी नाही.- गिरीश बापट,  खासदार
.....
समजूत पटली आहे
दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: शिवसैनिकांबरोबर संवाद साधला आहे. नाराजी होती, मात्र ती आता दूर झाली आहे. प्रत्येक मतदारसंघात स्थानिक शिवसैनिक भाजप उमेदवाराच्या प्रचारात आहे. त्यांच्या विभागनिहाय बैठका घेतल्या जात आहेत. त्यामुळे शिवसेना मागे यात तथ्य नाही.- संजय मोरे, पुणे शहरप्रमुख, शिवसेना

Web Title: Maharashtra Election 2019 : BJP-Sena has nothing mindly attached between in kasba ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.