कोथरूड निवडणूक निकाल २०१९ : चंद्रकांत पाटलांनी भाजपाचा बहुप्रतिष्ठित ''बालेकिल्ला '' राखला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 04:52 PM2019-10-24T16:52:31+5:302019-10-24T16:53:15+5:30
Pune's Kothrud Election Result & Winner 2019 : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोथरूड विधानसभा मतदार संघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विजय संपादन केला़..
पुणे : स्थानिक विरूध्द बाहेरचा म्हणून रंगतदार ठरलेल्या व संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोथरूड विधानसभा मतदार संघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विजय संपादन केला़. परंतू, एक लाखाहून अधिक मताधिक्क्य पाटील यांना मिळवून देऊ, हा भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेला दावा मात्र पूर्णपणे फोल ठरला आहे़. चंद्रकांत पाटील यांच्यासाठी एक प्रकारे काटे की टक्कर म्हणून ठरलेल्या या निवडणुकीत १ लाख ४ हजार मते मिळाली़. तर मनसेचे उमेदवार अॅड. किशोर शिंदे यांनी अनपेक्षित लढत देऊन ८० हजार मते मिळविली आहेत़. याच किशोर शिंदे यांना सन २०१४ च्या निवडणुकीत २१ हजार मते मिळाली होती़. पाटील यांना लाखाचे मताधिक्क्य देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांनी, आघाडीने मनसे उमेदवार शिंदे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला असता तर पंचवीस हजाराचे मताधिक्क्य मिळाले नसल्याचे मान्य करीत या कमी मताधिक्क्याबद्दल आप-आपसात बोट दाखविण्यास सुरूवात केली आहे़.
सन २०१४ मध्ये भाजप सेना स्वतंत्र लढूनही कोथरूडमध्ये भाजपच्या मेधा कुलर्णी यांना १ लाख ९४१ मते मिळाली होती़. तर शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत मोकोटे यांना ३६ हजार २७९ मते मिळाली होती़. यावेळी हे दोन्ही पक्ष एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरे जाऊनही पाटील यांना या एकूण मताच्या ३५ हजार कमी मते मिळाली आहेत़. विशेष म्हणजे सन २०१४ च्या तुलनेत या २०१९ च्या निवडणुकीत कोथरूडमध्ये ५६ हजार नवीन मतदार आहेत़.