Maharashtra Election 2019 : एबी फॉर्म न दिल्याने चिंचवडला राष्ट्रवादीचा अर्ज बाद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 03:18 PM2019-10-05T15:18:21+5:302019-10-05T15:18:42+5:30
या छाननीमध्ये शितोळे यांच्या अर्जात त्रुटी आढळल्याचे निदर्शनास आल्या आहे..
पिंपरी : एबी फॉर्म न दिल्याने चिंचवड विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा अर्ज बाद झाला आहे. आज उमेदवारी अर्जची छाननी होती.या छाननीमध्ये शितोळे यांच्या अर्जात त्रुटी आढळल्याचे निदर्शनास आल्याची निवडणूक आयोगाने माहिती दिली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूकीकरिता एकूण 19 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. आज झालेल्या छाननी प्रक्रियेमध्ये प्रशांत कृष्णराव शितोळे, शंकर पांडुरंग जगताप, विजय निवृत्ती वाघमारे, राजकुमार घनशाम परदेशी व प्रकाश भाऊराव घोडके या 5 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील नियम 33 नुसार अवैध ठरविण्यात आले आहेत.
भोसरीमध्ये राष्ट्रवादीला उमेदवार मिळाला नाही, पिंपरीत ऐनवेळी उमेदवार बदलण्याची नामुष्की आली आणि त्यातच चिंचवडच्या उमेदवाराचा आता अर्ज बाद झाला. बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची वाताहत सुरू झाल्याचे चित्र पिंपरी चिंचवड शहरात दिसत आहे.