Maharashtra Election 2019 : शरद बुट्टे पाटील यांची भाजपातून हकालपट्टी करा :  शिवसेनेची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 02:26 PM2019-10-14T14:26:42+5:302019-10-14T14:30:36+5:30

बंडखोर उमेदवार अतुल देशमुख यांच्या प्रचारात उघडपणे सहभागी झालेले भाजपाचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांची भाजपातून तडकाफडकी हकालपट्टी करा...

Maharashtra Election 2019 : Doing Sharad Butte Patil suspension from BJP : demand by Shiv Sena | Maharashtra Election 2019 : शरद बुट्टे पाटील यांची भाजपातून हकालपट्टी करा :  शिवसेनेची मागणी 

Maharashtra Election 2019 : शरद बुट्टे पाटील यांची भाजपातून हकालपट्टी करा :  शिवसेनेची मागणी 

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसेना - भाजपा महायुतीत देशमुख यांनी भाजपातून बंडखोरी

खेड : बंडखोर उमेदवार अतुल देशमुख यांच्या प्रचारात उघडपणे सहभागी झालेले भाजपाचे गटनेते तथा जिल्हा परिषदेचे सदस्य शरद बुट्टे पाटील यांची भाजपातून तडकाफडकी हकालपट्टी करून त्यांच्यावर शिस्त भंगाची कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली. 
    खेड - आळंदी विधानसभा मतदार संघातून सुरेश गोरे हे सलग दुसऱ्यांदा ही निवडणूक लढवत असून, गोरे हे शिवसेना - भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार असतानाही या निवडणुकीत देशमुख यांनी भाजपातून बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे भाजपाने कारवाईचा बडगा उगारून देशमुख यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी केली. मात्र, त्यांना पाठबळ देण्यासाठी शरद बुट्टे हे उघडपणे देशमुख यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. त्यामुळे बुट्टे पाटील यांची पक्षाने सखोल चौकशी करून तातडीने हकालपट्टीसह त्यांच्यावर शिस्तभंगाची कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवेसेनेच्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आली. शिवसेनेच्या या बैठकीला सेनेचे जिल्हा प्रमुख माऊली आबा कटके, जिल्हा उपप्रमुख शिवाजीराव वरपे, खेड तालुका प्रमुख रामदास धनवटे आदींसह सेनेचे पदाधिकारी व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    माऊली कटके यावेळी म्हणाले," युती धर्म न पाळता बुट्टे पाटील यांच्यासह भाजपाचे अन्य कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारीही बंडखोर उमेदवार देशमुख यांच्या प्रचारात उघडपणे सहभागी झाले आहेत. अशा कार्यकर्त्यांची हकालपट्टी करून त्यांच्यावर शिस्त भंगाची कारवाई होणे अपेक्षित आहे." वरील उपस्थितांनीही यावेळी या प्रकाराचा जाहीर निषेध केला

Web Title: Maharashtra Election 2019 : Doing Sharad Butte Patil suspension from BJP : demand by Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.