Maharashtra Election 2019 : हडपसरमध्ये मतदान केंद्रांसाठी २ कोटींचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 11:50 AM2019-10-18T11:50:41+5:302019-10-18T11:52:20+5:30
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पत्राशेड टाकून १७५ मतदान केंद्रांची निर्मिती
पुणे : हडपसर विधानसभा मतदार संघातील पहिला आणि दुसऱ्या मजल्यावरील सर्व मतदान केंद्रे रद्द करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले दिले आहेत. त्यानुसार हडपसर मतदारसंघातील ४५४ मतदान केंद्रांपैकी सुमारे १७५ मतदान केंद्रे शाळा व सार्वजनिक मोकळ्या जागांमध्ये तात्पुरते पत्र्याचे शेड व पार्टिशन टाकून करण्यात आले आहे. यासाठी तब्बल १ कोटी ९६ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला असून, शेड उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
वृद्ध, अपंग, आजारी मतदारांना देखील सहजरीत्या मतदान केंद्रांत जाऊन मतदान करता येईल, अशाच ठिकाणी मतदान केंद्रे उभारण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. हडपसर (२१३) विधानसभा मतदारसंघात अनेक मतदान केंदे्र ही शाळेच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर होती. यामुळे महापालिका किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानासाठी आलेल्या मतदारांना अनेक अडचणींना तोड द्यावे लागले. पायºया चढून जाणे शक्य नसलेल्या मतदारांना खुर्च्यांमध्ये बसवून उचलून नेण्याची वेळ अनेक ठिकाणी आली. यासारख्या गैरसोयीमुळे अनेक ठिकाणी मतदारांना मतदानाचा हक्क देखील बजावता आला नाही. यामुळेच निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर घेण्याच आदेश दिले. जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल ५ लाख ४ हजार ४४ मतदार हडपसर विधानसभा मतदारसंघात आहेत. यामुळे एकूण मतदान केंद्रांची संख्यादेखील मोठी आहे. शाळांची अपूर्ण संख्या लक्षात घेता निवडणूक प्रशासनाला पत्राशेड टाकून मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी तब्बल १ कोटी ९६ हजार रुपयांचा खर्च आला असून, या खर्चाला शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मान्यता देखील दिली आहे.
.........
पत्राशेडमध्येदेखील अद्ययावत सुविधा
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पत्राशेड टाकून मतदान केंद्र उभारण्यात येत आहेत. यामध्ये वीज, पाणी, पंखे, आदीसह सर्व अद्ययावत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. शाळांची मैदाने, सार्वजनिक जागांमध्ये हे शेड उभारण्यात आली आहेत. राज्यात हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये पत्राशेड असलेली सर्वांधिक मतदान केंद्र आहेत. आयोगाच्या सूचनेनुसारच हा खर्च करण्यात येत असून, शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अंदाजपत्रक व पत्राशेडसाठी मंजुरी घेण्यात आली आहे.- भारत वाघमारे, निवडणूक निर्णय अधिकारी, हडपसर
...........
एकूण मतदार : 5,40,044
........
एकूण मतदान केंद्रे : 454
............
एकूण पत्राशेड मतदान केंदे्र :175
.....
ूएकूण संवेदनशील मतदान केंदे्र :17