Maharashtra Election 2019 : वडगाव शेरीत राष्ट्रवादीला खिंडार: माजी आमदार बापू पठारे भाजपमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 12:02 PM2019-10-15T12:02:12+5:302019-10-15T12:02:31+5:30

पक्षाने मला वाईट वागणूक दिली...

Maharashtra Election 2019: Former NCP MLA Bapu Pathare in BJP | Maharashtra Election 2019 : वडगाव शेरीत राष्ट्रवादीला खिंडार: माजी आमदार बापू पठारे भाजपमध्ये

Maharashtra Election 2019 : वडगाव शेरीत राष्ट्रवादीला खिंडार: माजी आमदार बापू पठारे भाजपमध्ये

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बापू पठारे यांनी सोमवारी रात्री भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर मुंबईत हा प्रवेश झाला. आमदार जगदीश मुळीक यांच्यासमवेत पठारे सोमवारी सायंकाळी वडगावशेरीतून मुंबईला रवाना झाले. राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठाच धक्का बसला असून, भाजपने निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात त्यांना खिंडीत गाठले आहे.
राष्ट्रवादीचे या मतदारसंघातील उमेदवार सुनील टिंगरे यांना याचा जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीबरोबर  बोलताना पठारे म्हणाले, पक्षाने मला वाईट वागणूक दिली. मुंबईत पक्षाची बैठक झाली, त्याचे मला निमंत्रणसुद्धा नव्हते. टिंगरे किंवा आपण अशी कोणालाही उमेदवारी मिळाली तरी काम करायचे असे ठरले होते, मात्र आपल्याला सामावून घेतले गेले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या दबावातून हा निर्णय घ्यावा लागला. अमदार मुळीक गेले काही दिवस पठारे यांच्या सातत्याने संपर्कात होते. त्यांनीच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तुमचा प्रवेश घडवतो असे सांगत पठारे यांना राजी केले असल्याची चर्चा आहे.
भाजपचे आमदार जगदीश मुळीक यांनी प्रयत्नर्पुूाक पठारे यांना प्रवेशासाठी तयार केले असल्याचे सांगण्यात येते. सुनील टिंगरे हे मागील वेळी थोड्याच मतांनी पराभूत झाले होते. त्या वेळी त्यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेतून उमेदवारी केली होती. मात्र पालिका निवडणुकीच्या वेळी ते परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. आता विधानसभेच्या उमेदवारीसाठी त्यांनी पठारे यांच्यावर मात केली. तेव्हापासूनच पठारे नाराज होते. पठारे यांनीही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे, मात्र त्यानंतर म्हणजे सन २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. आता पठारे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला ऐननिवडणुकीच्या तोंडावर खिंडीत गाठले आहे. 
 

Web Title: Maharashtra Election 2019: Former NCP MLA Bapu Pathare in BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.