Maharashtra Election 2019 : गृहमंत्री अमित शहा यांचा शिरूरला रोड शो 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 11:44 AM2019-10-14T11:44:18+5:302019-10-14T11:44:33+5:30

पाबळ फाट्यापासून ते विद्याधाम प्रशाला कॉर्नर असे रोड शोचे नियोजन

Maharashtra Election 2019 : Home Minister Amit Shah's road show in the Shirur | Maharashtra Election 2019 : गृहमंत्री अमित शहा यांचा शिरूरला रोड शो 

Maharashtra Election 2019 : गृहमंत्री अमित शहा यांचा शिरूरला रोड शो 

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकांची गर्दी : उशीर झाल्याने कार्यक्रम करावे लागले रद्द

शिरूर : शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार बाबुराव पाचर्णे यांच्या प्रचारार्थ आयोजित देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा रोड शो झाला. शहा यांनी ४० मिनिटांत हा रोड शो आटोपला. शहा यांना येण्यास उशीर झाल्याने शिरूरमधील त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले.  
अमित शहा यांच्या रोड शोचे रविवारी ३ वाजता आयोजन करण्यात आले होते. दुपारपासून लोकांनी शहरातून जाणाऱ्या पुणे-नगर रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. 
पाबळ फाट्यापासून ते विद्याधाम प्रशाला कॉर्नर असे रोड शोचे नियोजन होते. यादरम्यान ते येथील बाजार समितीतील शिवाजीमहाराजांच्या तसेच डॉ. आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास हार घालण्याचे नियोजन होते. यानंतर येथील जैन मंदिरात ते दर्शन घेणार होते. 
गुरुमहाराज त्यांना मंगळीक देणार होते. यानंतर नगर परिषदेसमोर ते जनतेशी संवाद साधणार होते. पण अमित शहा यांना येण्यास उशीर झाला. ते शिरूरमध्ये पाचला पोहोचले. उशीर झाल्याने सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले. केवळ रोड शो करून ते पुढील कार्यक्रमास रवाना झाले. त्यांच्या रोड शोला प्रचंड प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी  शहा यांच्यावर पुष्पवृष्टी केली, तसेच हार घातले. शहा यांनी नागरिकांना अभिवादन करून सर्व हार त्यांच्यात भिरकावले.  
.......
शहा रोड शोसाठी शहरात येणार म्हणून सीआरपीएफ, एसपीजी, जिल्हा पोलीस असा दोनशे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. 
.........
परिसरातील इमारतींवर पोलीस टेहळणी करण्यासाठी तैनात होते. यामुळे या परिसराला छावणीचे रूप आले होते. 

Web Title: Maharashtra Election 2019 : Home Minister Amit Shah's road show in the Shirur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.