कोथरुडकरांनी विश्वास दिला तर राज्यात मोकळ्या मनाने फिरेन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 03:42 PM2019-10-07T15:42:12+5:302019-10-07T15:45:37+5:30
कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडकरांनी विश्वास दिला तर राज्यात मोकळ्या मनाने फिरेन असे मत पुण्यात व्यक्त केले. पुण्यातील ब्राह्मण संघटनांच्या बैठकीनंतर त्यांनी हे मत व्यक्त केले.
पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडकरांनी विश्वास दिला तर राज्यात मोकळ्या मनाने फिरेन असे मत पुण्यात व्यक्त केले. पुण्यातील ब्राह्मण संघटनांच्या बैठकीनंतर त्यांनी हे मत व्यक्त केले.
पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यात प्रदेशाध्यक्ष पाटील यांचाही समावेश आहे. भाजपासाठी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या काेथरुड विधानसभा मतदार संघातून ते निवडणुक लढवत आहेत. त्यांच्या उमेदवारीला स्थानिक नसल्याचे कारण देत विरोधही झाला होता. पण अखेर नाराजांची समजूत घालून पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्यासमोर आघाडीने उमेदवार न देता मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा देऊन मतांचे विभाजन टाळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पाटील यांची लढाई अधिक कठीण होऊ शकते असे सांगण्यात येते.
त्याबाबत बोलताना पाटील यांनी ब्राहमण संघटनांचा विरोधाचा विषय काही वेळात संपेल असे मत व्यक्त केले. पुढे ते म्हणाले की,मला न्याय मिळाला पण मेधाताईवर अन्याय झाला.पण त्यांना फार काळ वाट पाहावी लागणार नाही. भाजपच्या चिन्हावर लढण्यासाठी मित्रपक्षांची कोणतीही नाराजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी कोथरुडकरांनी विश्वास दिला तर राज्यात मोकळ्या मनाने फिरेन असेही म्हणाले.