Maharashtra Election 2019 : खेड तालुक्यातील जनता थापांना भुलणार नाही : सुरेश गोरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 01:20 PM2019-10-11T13:20:29+5:302019-10-11T13:20:42+5:30

शिरूर लोकसभेच्या निवडणुकीत भावनेच्या आहारी जाऊन घेतलेला निर्णय आता नागरिकांसाठी पश्चात्ताप बनला आहे.

Maharashtra Election 2019 : Khed taluka people will not under in fake message : Suresh Gore | Maharashtra Election 2019 : खेड तालुक्यातील जनता थापांना भुलणार नाही : सुरेश गोरे 

Maharashtra Election 2019 : खेड तालुक्यातील जनता थापांना भुलणार नाही : सुरेश गोरे 

Next

खेड :  तालुक्यातील जनतेने दहा वर्षांत खूप काही सहन केले़. तालुक्यातील जनतेला अक्षरश: लुटले; तेच आता मतांसाठी गयावया करत फिरत आहेत.या गुंडांच्या राजकारणाला जनता आता कंटाळली आहे़. त्यामुळे कोणीतीही स्वप्ने दाखवली तरी इथली जनता भूलथापांना बळी पडणार नाही़. त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे विजय निश्चित असल्याचा विश्वास आमदार सुरेशे गोरे यांनी व्यक्त केला़. 
शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार सुरेश गोरे यांच्या प्रचाराचा नारळ निमगाव (ता. खेड) येथे श्रीक्षेत्र खंडोबा मंदिरात माजी खासदार शिवराजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते फोडण्यात आला़ या वेळी  बाबाजी काळे, संतोष डोळस,  शिवाजी वर्पे, विजया शिंदे, सुभद्रा शिंदे, भगवान पोखरकर, ज्योती आरगडे, सुनीता सांडभोर, रूपाली कड, अंकुश राक्षे, अमर कांबळे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, विजयसिंह शिंदे पाटील, किरण मांजरे, सूर्यकांत मुंगसे, अशोक खांडेभराड, सुरेश चव्हाण, प्रकाश वाडेकर, नंदा कड, माऊली कटके आदीउपस्थित होते़ 
शिवाजीराव आढळराव-पाटील म्हणाले, शिरूर लोकसभेच्या निवडणुकीत भावनेच्या आहारी जाऊन घेतलेला निर्णय आता नागरिकांसाठी पश्चात्ताप बनला आहे. राष्ट्रवादी पक्षाची आता वाताहत झाली आहे. पुणे व पिंपरी परिसरात घड्याळ घेता का घड्याळ इतकी वाईट परिस्थिती आहे. देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे, त्यामुळे जनतेने आता सेना-भाजपला साथ दिली पाहिजे.  यावेळी माऊली कटके,अशोक खांडेभराड आदींची भाषणे झाली.
.......
मित्रपक्षाचा तांडा अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी असले तर आम्हालाही वेगळा निर्णय घ्यावा लागेल. ज्याने दहा वर्षांत जनतेला त्रास दिला त्याला निवडून आणायचे आहे का? असा सवाल करीत आमचे नाणे खणखणीत आहे. खेड तालुक्याचा विकास आमदार सुरेश गोरे यांनी केला असून, तेच पुन्हा बहुमताने निवडून येतील, असा विश्वासही शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला़. 
..........

Web Title: Maharashtra Election 2019 : Khed taluka people will not under in fake message : Suresh Gore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.