महाराष्ट्र निवडणूक २०१९ : मतदान केंद्राच्या परिसरातील शंभर मीटरची ' लक्ष्मणरेषा ' धाब्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 08:22 PM2019-10-21T20:22:04+5:302019-10-21T20:23:20+5:30

Pune Election 2019 : मोबाईलवर बोलणे, घोळका करणे, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना बंदी अशी विविध बंधने या परिसरात असतात.

Maharashtra Election 2019 : Line cross of One hundred meters rule on polling booth | महाराष्ट्र निवडणूक २०१९ : मतदान केंद्राच्या परिसरातील शंभर मीटरची ' लक्ष्मणरेषा ' धाब्यावर

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : मतदान केंद्राच्या परिसरातील शंभर मीटरची ' लक्ष्मणरेषा ' धाब्यावर

Next
ठळक मुद्देराजकीय पक्षांचे बुथही किमान २०० मीटर अंतरावर

पुणे : मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरात मतदान कर्मचारी व मतदार वगळता इतर कोणालाही प्रवेशास बंदी आहे. मोबाईलवर बोलणे, घोळका करणे, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना बंदी अशी विविध बंधने या परिसरात असतात. पण पर्वती मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रांवर ही बंधने धाब्यावर बसविण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही मतदान केंद्रांच्या इमारतीमध्येच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते निवडणुक कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालताना दिसून आले. तर मतदान कक्षामध्येही सर्रासपणे मोबाईलचा वापर होत होता.
केंद्रीय निवडणुक आयोगाच्या नियमांनुसार मतदान केंद्राच्या परिसरातील १०० मीटर अंतरावर लक्ष्मणरेषा आखली जाते. मतदान प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे, यादृष्टीने हा नियम करण्यात आला आहे. तसेच राजकीय पक्षांचे बुथही किमान २०० मीटर अंतरावर असावेत, असा नियम आहे. मात्र, सोमवारी पर्वती मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांवर या नियमांना केराची टोपली दाखविण्यात आली. सिंहगड रस्त्यावरील ज्ञानगंगा हायस्कुलमध्ये मतदान केंद्र होते. या इमारतीच्या आवारातच काही कार्यकर्ते मतदारांना ‘लक्षात आहे ना’ असे सांगत मतदान कोणाला करायचे याची आठवण करून देत होते. पर्वतीमधील लक्ष्मीबाई साळुंके विद्यालयाच्या आवारातही हेच चित्र पाहायला मिळाले. मतदार केंद्रामध्ये आल्यानंतर काही कार्यकर्ते त्यांच्याजवळ जाऊन विचारपुस करताना दिसत होते. 
राजकीय पक्षांचे बुथवर मतदारांना त्यांच्या नावाच्या स्लिप दिल्या जात होत्या. पण बहुतेक मतदार केंद्र परिसरातील बुथ २०० मीटर अंतराच्या आतच होते. काही बुथ तर १०० मीटरच्या आतही पाहायला मिळाले. तिथूनच मतदारांना स्पीप वाटप केले होते. काही बुथवर राजकीय पक्षाचे चिन्ह असलेल्या स्लीपचे वाटप होत होते. त्यामुळे मतदारही त्याच स्लीप मतदान केंद्रात घेऊन जात होते. काही केंद्रांवर त्यांना अडवून चिन्हाचा भाग फाडण्यात आला. मतदान केंद्रांमध्ये मोबाईल नेण्यास बंदी असली तरी त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करण्यात आले. मार्केटयार्ड येथील कटारिया हायस्कुलमधील एका केंद्रांवर मोबाईलला बंदी असा फलक पाहायला मिळाला. पण या केंद्रासह लगतच्या इतर केंद्रांवर बहुतेक प्रत्येकाकडे मोबाईल होता. काही जण तर मतदान केंद्रांमध्येच मोबाईलवर बोलताना आढळून आले. पोलिसांकडून अशा मतदारांना हटकले जात होते. 
--------------

Web Title: Maharashtra Election 2019 : Line cross of One hundred meters rule on polling booth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.