Maharashtra Election 2019 : दौंडमध्ये ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई’: रमेश थोरात 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 01:35 PM2019-10-11T13:35:52+5:302019-10-11T13:37:17+5:30

आमदार राहुल कुल यांच्या विरोधात परिवर्तनाची सुप्त लाट पसरली आहे..

Maharashtra Election 2019 : 'Manpower against wealth war in daund ': Ramesh Thorat | Maharashtra Election 2019 : दौंडमध्ये ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई’: रमेश थोरात 

Maharashtra Election 2019 : दौंडमध्ये ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई’: रमेश थोरात 

googlenewsNext

दौैंड : भीमा-पाटस कारखान्याची वाट लावणारे कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल यांच्या विरोधात परिवर्तनाची सुप्त लाट पसरली असून, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होणार असल्याचे मत राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाचे उमेदवार रमेश थोरात यांनी खडकी (ता. दौैंड) येथे जाहीर सभेत व्यक्त केले. 
 तालुक्यात ठिकठिकाणचे ग्रामस्थ रमेश थोरात यांना निवडणुकीसाठी आर्थिक मदत देत आहेत. त्यानुसार खडकी येथील युवकांनी पैसे गोळा करुन ११ हजारांचा निधी थोरात यांना दिला. तर काही गावांमध्ये घरटी हजार, पाचशे रुपये दिले जात आहेत.  रमेश थोरात म्हणाले, भीमा पाटस कारखान्यावर सध्याच्या परिस्थितीत ४00 कोटी रुपयांच्या जवळपास कर्ज आहे. गेल्या काही वर्षांपासून कामगारांचे पगार थकलेत तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैैसे थकीत असून, एफआरपी देखील मिळालेली नाही. 
एका ट्रॅक्टरवर चार बँकांचे कर्ज काढून कारखान्याच्या अध्यक्षांनी बँकांची फसवणूक केली आहे. अजून कुणाकुणाची फसवणूक करणार? असाही प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला. 
मी कारखान्यात असताना कारखान्यावर ३८ कोटींचे कर्ज होते. तर कारखान्याकडे ७५ कोटींची साखर शिल्लक होती.  इतर कारखान्यांच्या तुलनेत उसाला भाव दिला जात होता. तर कामगारांचे पगार आणि सभासद शेतकºयांची देणी वेळेवर दिली गेली. मात्र आता सध्या कारखाना बंद आहे. याला जबाबदार कुलच आहेत. 
..........

कारखान्याचे खापर इतरांवर फोडू नये...
वेळेवर पगार होत नसल्यामुळे भीमा-पाटसच्या काही कामगारांना तालुक्यातच भाजीपाला विकावा लागत आहे तर काही  रिक्षा चालवत आहेत, नेमके याला जबाबदार कोण?  हे तालुक्याला माहीत आहे. ज्याला कारखाना न्ीाट चालवता आला नाही त्याने अपयशाचे खापर इतरांवर फोडू नये असे रमेश थोरात म्हणाले. 
......

Web Title: Maharashtra Election 2019 : 'Manpower against wealth war in daund ': Ramesh Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.