Maharashtra Election 2019 : स्वार्थाचे राजकारण करणार्‍यांना घरी बसवा : योगी आदित्यनाथ 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 06:41 PM2019-10-14T18:41:44+5:302019-10-14T19:03:59+5:30

 राजकारण करताना विचारधारा नसली तर असे स्वार्थी राजकारण समाजाचे व राष्ट्राचे नुकसान करते.

Maharashtra Election 2019 : Put the politicians of selfishness at home : Yogi Adityanath | Maharashtra Election 2019 : स्वार्थाचे राजकारण करणार्‍यांना घरी बसवा : योगी आदित्यनाथ 

Maharashtra Election 2019 : स्वार्थाचे राजकारण करणार्‍यांना घरी बसवा : योगी आदित्यनाथ 

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसेना व भाजपा यांची मुल्यनिती एक असल्याने हे दोन्ही पक्ष युतीतपाच वर्षानंतर देशात व राज्यात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण

लोणावळा : स्वार्थाचे राजकारण करणार्‍यांना घरी बसवा असे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मावळवासीयांना केले. मावळ विधानसभेचे भाजपा, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार बाळा भेगडे यांच्या प्रचाराकरिता लोणावळा शहरात आयोजित सभेत योगी आदित्यनाथ यांनी मावळवासीयांना मार्गदर्शन करताना स्वार्थी राजकारणावर टिका केली.

   यावेळी राज्यमंत्री बाळा भेगडे, रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, प्रचारप्रमुख रविंद्र भेगडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, लोणावळा शहराध्यक्ष श्रीधर पुजारी, शिवसेना शहराध्यक्ष सुनिल इंगूळकर, रिप‍ाईच्या महिलाध्यक्षा यमुना साळवे, बिंद्रा गणात्रा, शौकत शेख, भरत हारपुडे, मोतीराम मराठे, देविदास कडू आदी मान्यवर उपस्थित होते.

योगी म्हणाले,  राजकारणात कार्यकर्ते अनेक व तिकीट एक असते, त्यांच्यामध्ये तिकीट मिळविण्याकरिता निकोप स्पर्धा असते. मात्र संधीसाधू व्यक्ती ह्या राजकारणात स्वार्थासाठी पक्ष बदलतात त्यांना उद्या कोणी काही लालच दाखविल्यास ते महाराष्ट्राच्या विरोधात देखिल उभे होतील अशा स्वार्थी व संधीसाधू राजकारण्यांना घरी बसवावे. राजकारण हे स्वार्थाचे नसावे ते परमार्थ, आदर्श, मुल्यावर आधारित असावे. सत्ता राष्ट्राला समर्पित असल्यास विकास कसा होतो हे मागील पाच वर्षात देशाने पाहिले आहे. मागील 70 वर्ष देशाचे विभाजन करणारे काँग्रेस पक्षाने लादलेले कलम 370 मोदी सरकारने रद्द करत देशाला एक भारत श्रेष्ठ भारत बनविले. महिला सशक्तीकरणाकरिता तिहेरी तलाक विरुध्द कायदा करत मुस्लिम महिलांना सन्मान मिळवून दिला. बाळा भेगडे यांनी 1400 कोटी रुपयांचा निधी आणत मावळात विकास केला. त्यांची योग्यता व क्षमता पाहून त्यांना भाजपाने पुन्हा संधी दिली आहे. भेगडे यांनी मावळ तालुक्याला विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेहले आहे.

     राजकारण करताना विचारधारा नसली तर असे स्वार्थी राजकारण समाजाचे व राष्ट्राचे नुकसान करते. सिध्दांतहिन राजकारण म्हणजे मृत्युचा फंदा असल्याने संधीसाधू मंडळींना सत्तेपासून दूर ठेवा. शिवसेना व भाजपा यांची मुल्यनिती एक असल्याने हे दोन्ही पक्ष युतीच्या माध्यमातून एकत्र राजकारण करतात. ह्या निवडणुकीत देखिल ह्या मुल्यांची जपणूक केली जाणार आहे. भाजपा शिवसेना रिपाईच्या सरकारने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचारी राजकारणाला आळा घालण्याचे काम केले आहे. पाच वर्षापुर्वी देशात व राज्यात आतंकवाद व दहशतवाद माजला होता, आज पाच वर्षानंतर देशात व राज्यात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगितले.

     राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मनोगतात मावळात केलेल्या विकासकामांचा पाडा वाचून दाखवत काय विकास केला म्हणणार्‍यांनी समोर येऊन बसावे असे आवाहन विरोधकांना केले. मी शिवरायांचा मावळा आहे, राजकारण निष्ठेने करतो, फसवा फसवी माझ्या रक्तात नाही, मावळातील जाधववाडी येथिल जमिनीचा प्रश्न, पवना धरण बाधितांचा जमिनीचा प्रश्ना, रिंगरोड, कार्ला व नवलाख उंब्रे एमआयडीसीचा विषय ही अनेक वर्षाची रखडलेली कामे मार्गी लावली. शेतकर्‍यांची जमिन शेतकर्‍यांना परत देण्याची भावना असावी लागते, ती आमच्याकडे होती म्हणून विषय मार्गी लागले. पवना जलवाहिनीचे राजकारण नाही केले तर शहिदांच्या वारसांना नोकर्‍या दिल्या, 179 शेतकर्‍यांवर दाखल झालेले गंभिर स्वरुपाचे गुन्हे मागे घेतले. भविष्यात देखिल शेतकर्‍य‍ांवर अन्याय होऊ देणार नाही असा शब्द यावेळी मावळवासीयांना दिला.
    नगराध्यक्षा सुरेखा जाधव, रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे व भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी त्यांच्या भाषणांमध्ये सुनिल शेळके यांच्या आरोपांचा समाचार घेतला. यावेळी व्यासपिठावर आलेल्या माकडाचे उदाहरण देत वाघमारे म्हणाले माकडाला निष्ठा कळते पण एका ताटात खाणार्‍यांना निष्ठा कळत नाही. मावळात उड्या मारणार्‍या ह्या माकडाला थांबविण्याचे आवाहन भाजपाप्रमाणे शिवसैनिक व भिमसैनिकांनी स्विकारले आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 : Put the politicians of selfishness at home : Yogi Adityanath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.