Maharashtra election 2019: मावळमध्ये भाजपला मोठा झटका, सुनील शेळके राष्ट्रवादीचे उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 12:02 PM2019-10-03T12:02:38+5:302019-10-03T12:02:45+5:30

सुनिल शेळके यांराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मावळात उमेदवारी देत काट्याने काटा काढण्याचा डाव खेळला आहे.

Maharashtra election 2019: Sunil Shelke vidhan sabha canditate of ncp in maval | Maharashtra election 2019: मावळमध्ये भाजपला मोठा झटका, सुनील शेळके राष्ट्रवादीचे उमेदवार

Maharashtra election 2019: मावळमध्ये भाजपला मोठा झटका, सुनील शेळके राष्ट्रवादीचे उमेदवार

googlenewsNext

पुणे - मावळ विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसला असून सुनील शेळके यांना राष्ट्रवादी काँगेसने उमेदवारी दिली आहे. खेडमधून दिलीप मोहिते राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. 
शेळके भाजपकडून इच्छुक होते. त्यावरून विद्यमान आमदार बाळा भेगडे यांच्याशी त्यांचा संघर्ष सुरू होता. काही दिवसांपूर्वी दोघाच्या गटात मारामारी झाली होती. राष्ट्रवादीने काल जिल्ह्यातील बहुतेक जागा जाहीर केल्या पण मावळची उमेदवारी जाहीर केली नव्हती. भाजप नाराजीचा फायदा घेण्यासाठी हे केले होते. काल रात्री भाजपने भेगडे यांची उमेदवारी जाहीर केल्यावर शेळके यांचा निर्णय झाला. त्यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारली. मावळ लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या बाळा भेगडे सतत दोन वेळा निवडून आले आशेत. त्यापूर्वी दोन निवडणुकात दिगंबर भेगडे भाजपचे आमदार होते. 
शेळके याना उमेदवारी दिली असली तरी राष्ट्रवादीचे इतर इच्छुक भूमिका घेतात महत्वाचे ठरणार आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या बंडखोरीमुळेच ही जागा त्यांना कधीही जिंकता आलेली नाही. मदन बाफना यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर येथे विजय मिळविला होता.
खेडमध्ये आता शिवसेनेचे सुरेश गोरे आणि राष्ट्रवादीचे मोहिते यांचा सामना रंगणार आहे. भाजपचे नाराज अतुल देशमुख यांची बंडखोरी कायम राहिलुअस गोरे यांच्या अडचणी वाढू शकतात.

Web Title: Maharashtra election 2019: Sunil Shelke vidhan sabha canditate of ncp in maval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.