Maharashtra Election 2019: लोकसभेपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून निवडून येईन : चंद्रकांत पाटील यांचा विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 12:51 PM2019-10-03T12:51:39+5:302019-10-03T12:53:14+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती 220 जागा मिळवेल...

Maharashtra Election 2019 : win by getting more votes than Lok Sabha : Chandrakant Patil | Maharashtra Election 2019: लोकसभेपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून निवडून येईन : चंद्रकांत पाटील यांचा विश्वास 

Maharashtra Election 2019: लोकसभेपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून निवडून येईन : चंद्रकांत पाटील यांचा विश्वास 

Next
ठळक मुद्देजोरदार शक्तीप्रदर्शन करत चंद्रकांत पाटील यांचा  कोथरुड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती 220 जागा मिळवेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. त्याच वेळी कोथरूडमधून लोकसभेपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून विजय संपादित करेल असेही ते म्हणाले. गुरुवारी सकाळी जोरदार शक्तीप्रदर्शन करत चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी कोथरुड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कोथरुड चौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून रॅलीला होणार सुरुवात केली. आज सकाळीच त्यांनी कोथरूडचे ग्रामदैवता म्हातोबाचे दर्शन घेतले.यावेळी  खासदार गिरीश बापट, संजय काकडे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे उपस्थित होते.यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले , दोन दिवस कोथरुडमध्येच आहे. त्यामुळे कुणाला जागा दिल्या नाहीत ते माहिती नाही, असे वक्तव्य त्यांनी एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांच्याबाबतीत करत खडसे यांच्या उमेदवारीवर बोलण्याच टाळलं. तसेच लोकसभेत कोथरूडमधून 1 लाख 6 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. आता त्यापेक्षा जास्त मिळेल

Web Title: Maharashtra Election 2019 : win by getting more votes than Lok Sabha : Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.