महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : खडकवासल्यात चुरशीच्या लढतीत दोडके पराभूत , तापकीरांची हॅट्ट्रिक 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 08:22 PM2019-10-24T20:22:04+5:302019-10-24T20:29:49+5:30

Pune Election Result 2019 : खडकवासला मतदारसंघामधे सात उमेदवार उभे होते

Maharashtra Election Result 2019 : Dodake defeated in the tough battle of Khadakwasla, Hattrik of Tapakir | महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : खडकवासल्यात चुरशीच्या लढतीत दोडके पराभूत , तापकीरांची हॅट्ट्रिक 

महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : खडकवासल्यात चुरशीच्या लढतीत दोडके पराभूत , तापकीरांची हॅट्ट्रिक 

Next
ठळक मुद्दे२ हजार ५९५ मतांनी विजयदोडकेंचा फेरमोजणीचा अर्ज फेटाळला

पुणे : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिन दोडके यांना भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांच्याकडून अवघ्या २५९५ मतांनी पराभव पत्करावा लागला. तापकीर यांनी १ लाख २० हजार ५१८ मते मिळवित विजयाची हॅट्ट्रिक केली. तर, दोडके यांनी १ लाख १७ हजार ९२३ मते मिळवित अपयशी झुंज दिली. 
खडकवासला मतदारसंघामधे सात उमेदवार उभे होते. या मतदारसंघात ४ लाख ८६ हजार ९४८ मतदार असून, त्यातील २ लाख ५० हजार ७१ (५१.३५ टक्के) जाणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात १ लाख ३७ हजार ३६६ पुरुष आणि १ लाख १२ हजार ७०५ स्त्रियांनी मतदान केले. मुख्य लढत तापकीर आणि दोडके यांच्यामधे झाली. दोडके यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली. पहिल्या फेरीत दोडके यांनी ६ हजार ९४८ तर तापकीर यांनी ३ हजार ४१६ मते होती. ही आघाडी पाचव्या फेरीला १३ हजार ३१ मतापर्यंत वाढली. 
त्यानंतर दोडके यांची आघाडी घटत गेली. अखेरीस १३ व्या फेरीस ७० मतांची किरकोळ आघाडी तापकीर यांना मिळाली. त्यानंतर अगदी १९व्या फेरीपर्यंत दोघांमधे चार-पाचशे मतांचा फरक होता. तापकीर यांनी विसाव्या फेरीत १ लाख ५ हजार ९२८ आणि दोडके यांना १ लाख ३ हजार ७४४ मते मिळविली. तेविसाव्या फेरीत तापकीर यांना १ लाख १८ हजार ६२७ आणि दोडके यांना १ लाख १६ हजार १२ मते मिळाली. त्यात त्यांना २११५ मतांची आघाडी होती. टपाली १४३ मते धरुन तापकीरांची आघाडी २२५८ झाली. तांत्रिक कारणांमुळे ५ यंत्रांच्या मतदार चिठ्ठ्या मोजण्यात आल्या. त्यातही २३०० मते होती. त्यामुळे दोडके यांचा पराभव त्याच वेळी निश्चित झाला. 
वंचित बहुजन आघाडीच्या अप्पा आखाडे यांना तिसºया क्रमांकाची ५,९३१ मते मिळाली. बहुजन समाज पार्टीच्या अरुण गायकवाड यांना ११८२, बहुजन मुक्ती पार्टीच्या अ?ॅड. राहुल बगाडे यांना ६५७ मते मिळाली. अपक्ष दीपक बलाढे यांना २६६ आणि बाळासाहेब पोळ यांना ३३४ मते मिळाली. या उमेदवारांपेक्षा नोटाला ३,५६१ इतकी मते आहेत. 
---------------------------

पाच मतदान पेट्यांमुळे निकाल लांबला
तीन मतदान यंत्राचे कंट्रोल युनिट-डिस्प्ले बंद होते. तर, दोन यंत्रातील झालेले मतदान आणि मतदानाच्या दिवशी यंत्र सील करताना नोंदलेल्या मतामधे एक-दोन मतांची तफावत होती. या पाचही यंत्रातील व्हीव्हीपॅटमधील मतदार चिठ्ठी मोजण्यात आली. झालेल्या मतदानामधे कोणतीही तफावत आढळली नाही. 
--------------------
दोडकेंचा फेरमोजणीचा अर्ज फेटाळला
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सचिन दोडके यांनी आंबादास जाधव यांच्यामार्फत मतदारसंघातील सर्व ४४६ मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅटमधील मतदार चिठ्ठी मोजण्याची मागणी केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांनी ही मागणी फेटाळली. 

Web Title: Maharashtra Election Result 2019 : Dodake defeated in the tough battle of Khadakwasla, Hattrik of Tapakir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.