पुणे निवडणूक 2019: पुण्यात भाजपाच्या मुक्ता टिळक कसब्यातून २८ हजार मतांनी विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 01:02 PM2019-10-24T13:02:12+5:302019-10-24T13:03:22+5:30
kasba peth election 2019: कोथरूड मतदारसंघामध्ये चंद्रकांत पाटील हे पुढे आहेत..
पुणे : विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले असून पुण्यात आघाडी आणि युतीमध्ये चुरस होत असल्याची दिसून येत आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत पुण्यातील आठ जागांपैकी 5 जागांवर युती पुढे असून 4 जागांवर आघाडी युतीला आव्हान देत आहे. भाजपाच्या मुक्त टिळक यांनी काँग्रेसचे अरविंद शिंदे यांचा पराभव केला आहे. टिळक यांनी २८ हजार मतांनी विजयी मिळवला आहेत. पुण्यातील आठही जागांवरील मतमोजणी जोरात सूरु आहे.त्यात ४ जागांवर भाजप पुढे आहे तर ४ जागांवर आघाडीचे उमेदवार पुढे असल्याचे सध्याचे चित्र आहे.
कोथरूड मतदारसंघामध्ये चंद्रकांत पाटील हे पुढे आहेत. असेच चित्र पर्वतीमध्ये दिसून येत आहे. पर्वतीमध्ये भाजपच्या माधुरी मिसाळ आघाडीवर आहेत. तर वडगावशेरी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी चे सुनील टिंगरे हे मोठ्या फरकाने पुढे आहेत. हडपसरमध्ये राष्ट्रवादीचे चेतन तुपे विजयी झाले आहेत. खडकवसल्यामध्ये देखील राष्ट्रवादी आता पुढे गेली आहे. तर कॅन्टोन्मेंट मतदार संघामध्ये काँग्रेसचे रमेश बागवे पुढे आहेत. शिवाजीनगर मतदारसंघामध्ये भाजप चे सिद्धार्थ शिरोळे पुढे आहेत तर कसब्यामध्ये भाजपच्या मुक्ता टिळक यांचा विजय जवळजवळ निश्चित झाला आहे.