Maharashtra Election2019 : मोदींच्या सभेसाठी आधी झाडे कापली अन् आता मैदानात डांबरीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 17:18 IST2019-10-16T17:18:44+5:302019-10-16T17:18:59+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी पुण्यातील एस. पी. कॉलेजच्या मैदानावर सभा होणार आहे.

Maharashtra Election2019 : मोदींच्या सभेसाठी आधी झाडे कापली अन् आता मैदानात डांबरीकरण
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी पुण्यातील एस. पी. कॉलेजच्या मैदानावर सभा होणार आहे. या सभेसाठी मैदानातील अनेक झाडे कापल्याचे समोर आल्यानंतर आता मोदींचा ताफा मैदानात येणार आहे, तिथे डांबरीकरण करण्यात आले आहे. पुण्यातील आठही जागांवर भाजपाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगण्यात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी एस. पी. कॉलेजच्या मैदानावर ही सभा होणार आहे. या सभेसाठी 20हून अधिक झाडांची कत्तल करण्यात आली होती. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून झाडे कापल्याचे संस्थेचे म्हणणे होते, तर झाडे नाही तर फांद्या तोडल्याचे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या होत्या. सभेसाठी झाडे तोडल्याने टीका झाली असताना आता मैदानात, मोदी येणाऱ्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले आहे. दरम्यान मोदींची सभा गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता सभा होणार असून, या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. पावसाचे विघ्न सभेत येऊ नये यासाठी मोठ मोठाले तीन मंडप उभारण्यात आले आहेत.