Maharashtra Election2019 : गडकरींचा पुतळा पाडला तेव्हा भाजप काय करत होता?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 11:35 AM2019-10-15T11:35:33+5:302019-10-15T11:36:21+5:30

''मंत्रिपद मिळाल्यानंतर काम करालच; पण त्या कामांची नांदी ‘गडकरींचा पुतळा बसवून करा...''

Maharashtra Election2019 : What was the BJP doing when Gadkari's statue was demolished? | Maharashtra Election2019 : गडकरींचा पुतळा पाडला तेव्हा भाजप काय करत होता?

Maharashtra Election2019 : गडकरींचा पुतळा पाडला तेव्हा भाजप काय करत होता?

Next
ठळक मुद्देचित्रपट, नाटक, संगीत, साहित्य, नृत्य व अन्य कला क्षेत्रातील कलाकारांचा मेळावा

पुणे : ‘‘आम्हा नटांचा देव असलेल्या राम गणेश गडकरी यांचा पुतळा पाडण्यात आला. तेव्हा केंद्र, राज्य आणि महापालिकेत आपलंच सरकार होतं. मग पक्षाने काय केले,’’ असा सवाल विचारत अभिनेता-लेखक मिलिंद शिंत्रे यांनी कोथरूड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना निरुत्तर केले. ‘‘मंत्रिपद मिळाल्यानंतर काम करालच; पण त्या कामांची नांदी ‘गडकरींचा पुतळा बसवून करा’,’’ असेही या वेळी सुनावण्यात आले.
चित्रपट, नाटक, संगीत, साहित्य, नृत्य व अन्य कला क्षेत्रातील कलाकारांचा मेळावा सोमवारी (दि. १४) मनोहर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार, मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ, अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे, माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोर कलाकारांनी आपल्या मागण्या मांडताना मिलिंद शिंत्रे यांनी ‘राम गणेश गडकरी’ यांच्या पुतळ्याचा मुद्दा छेडला. ‘‘प्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटविल्यानंतर कलाकारांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेतही आपलीच सत्ता होती, मात्र सत्ताधाºयांकडून संभाजी बागेत अजूनही गडकरींचा पुतळा बसविण्यात आलेला नाही,’’ असेही मिलिंद शिंत्रे म्हणाले. कोथरूडमध्ये जागतिक दर्जाचे नाट्यगृह उभारायचं; पण त्यापूर्वी गडकरींच्या पुतळ्याची आमची मागणी पूर्ण करा, अशी मागणी पाटील यांच्याकडे केली. 
.........
‘‘सांस्कृतिक क्षेत्रात जे काही केले. त्यात काहीसे कमी पडलो,’’ अशी कबुली चंद्रकांत पाटील यांनी दिली. मात्र गडकरी प्रकरणावर बोलणे त्यांनी टाळले. दरम्यान, अभिनेते राहुल सोलापूरकर यांनीही सर्व ऐतिहासिक पुरावे असूनही, दादाजी कोंडदेव यांचा हटविलेला पुतळा पुन्हा बसविला नाही, यावरही बोट ठेवले. 

Web Title: Maharashtra Election2019 : What was the BJP doing when Gadkari's statue was demolished?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.