ऑक्सिजन एक्स्प्रेसद्वारे महाराष्ट्राला मिळाला फक्त १७४ टन प्राणवायू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:11 AM2021-05-08T04:11:00+5:302021-05-08T04:11:00+5:30
प्रसाद कानडे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना रुग्णांसाठी ‘श्वास’ ठरलेल्या भारतीय रेल्वेच्या ऑक्सिजन एक्स्प्रेसने आतापर्यंत संपूर्ण देशांत ४० ...
प्रसाद कानडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना रुग्णांसाठी ‘श्वास’ ठरलेल्या भारतीय रेल्वेच्या ऑक्सिजन एक्स्प्रेसने आतापर्यंत संपूर्ण देशांत ४० ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविल्या. यातून देशात आतापर्यंत २५११ मेट्रिक टन ऑक्सिजनची वाहतूक झाली. सर्वात जास्त टँकर दिल्ली व उत्तर प्रदेशमध्ये पोहचविले. तर महाराष्ट्रत आतापर्यंत ऑक्सिजनचे १० टँकर आले. यातून महाराष्ट्राला १७४ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा झाला. यात नाशिक व नागपूर शहराचा समावेश आहे.
राज्यासह देशांत ऑक्सिजनची मोठी कमतरता निर्माण झाल्यानंतर भारतीय रेल्वेने विविध राज्यांच्या मागणीनुसार ऑक्सिजनचा पुरवठा जलद व सुरक्षित पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविण्यास सुरुवात केली. यासाठी विशाखापट्टणम, अंगुल, बोकारो, राऊरकिला आदी ठिकाणच्या ऑक्सिजन प्लान्टमधून ऑक्सिजनची वाहतूक सुरू झाली. ती आजतागायत सुरू आहे.
चौकट
कोणत्या राज्यांना किती मिळाले
महाराष्ट्र १७४ मेट्रिक टन
उत्तर प्रदेश ६८९ मेट्रिक टन
मध्य प्रदेश १९० मेट्रिक टन
हरियाणा २५९ मेट्रिक टन
तेलंगणा १२३ मेट्रिक टन
दिल्ली १०५३ मेट्रिक टन
चौकट
ऑक्सिजन एक्स्प्रेसची सुरुवात महाराष्ट्रतून
देशात पहिल्या ऑक्सिजन एक्स्प्रेस सुरुवात झाली ती कळंबोली गुड्स शेडहून. पण आतापर्यंत महाराष्ट्रासाठी केवळ दोनच ऑक्सिजन एक्स्प्रेस दाखल झाल्या आहेत. पहिली विझागहून नागपूर व नाशिक येते दाखल झाली. त्यानंतर हापा येथून दुसरी ऑक्सिजन एक्स्प्रेस कळंबोली येथे दाखल झाली. आतापर्यंत राज्यात १० टँकर आले आहे.
कोट
राज्याच्या मागणीनुसार रेल्वेने ऑक्सिजन एक्स्प्रेसचा पुरवठा केला. शुक्रवारी रात्री नागपूरला ऑक्सिजनचे चार टँकर येणार आहे.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई