अदृश्य शक्तीचं इथं काही चालू शकत नाही, हे महाराष्ट्राने दाखवून दिलं; सुप्रिया सुळेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 04:07 PM2024-10-01T16:07:27+5:302024-10-01T16:08:52+5:30

महाराष्ट्राच्या जनतेने जी साथ दिली कारण की मायबाप जनतेच्या लक्षात आलं, आदरणीय पवार साहेब आणि उद्धव यांच्यावर अन्याय झाला आहे

Maharashtra has shown that invisible forces cannot do anything here Supriya Sule targets the rulers | अदृश्य शक्तीचं इथं काही चालू शकत नाही, हे महाराष्ट्राने दाखवून दिलं; सुप्रिया सुळेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

अदृश्य शक्तीचं इथं काही चालू शकत नाही, हे महाराष्ट्राने दाखवून दिलं; सुप्रिया सुळेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

पुणे: राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्ष, चिन्ह अजित पवार यांच्या गटाला गेले. शरद पवार यांच्या गटाला नवे चिन्ह आणि नाव देण्यात आले. तरीही शरद पवार गटाने लोकसभेला यश मिळवले. त्याबाबत बोलताना खासदार सुप्रिया सुळेंनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. राज्याने दाखवून दिलं की, अदृश्य शक्ती इथं चालू शकत नाही हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, एक वर्षांपूर्वी आमचा पक्ष कुठे होता,चिन्ह कुठे होतं,आमदार खासदार जे जी सत्तेची पद होती. त्यातील पक्ष, चिन्ह घेऊन त्यांनी आमचं आयुष्य उध्वस्त केले. सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नहीं. मायबाप महाराष्ट्राच्या जनतेने जी साथ दिली कारण की मायबाप जनतेच्या लक्षात आलं की आदरणीय पवार साहेब आणि उद्धव यांच्यावर अन्याय झाला आहे. अदृश्य शक्ती दिल्लीवरून काहीही करू शकते असं त्यांना नेहमी वाटत. पण आपल्या महाराष्ट्राने दाखवून दिलं की, अदृश्य शक्तीच इथं काही चालू शकत नाही. हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो. 

लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र आर्थिक अडचणीत येईल असे विरोधकांचे मत आहे. हा निर्णय वित्त मंत्रालयाच्या विरोधात असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले होते. आता त्यांनी हा निर्णय रेटला असल्याचे वक्तव्य केलं आहे. सुळे म्हणाल्या,  डेटा फार महत्वाचा आहे, जो महारष्ट्र सरकारकडून येतो तुम्ही किती लोन घेऊ शकतात. केंद्र किंवा राज्याला काही लिमिट अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात घातले होते. एफ आर बी एम कायदा कायद्याबद्दल सर्वांचे एक मत आहे. जास्त लोन घेणं, हा कायदा फॉलो केला जातं नाही. यावर जयंत पाटील यांनी डेटा वाईज यावर बोलले होते. गडकरी, राज ठाकरे हे तेच म्हणतं आहे. अभ्यासाची तसेच म्हणतात त्यामुळे डेटा सगळं सांगतो. निर्णय रेटला आहे, ऑब्जेक्शन असताना. लोकशाही मध्ये सगळयांना बोलण्याचा अधिकार आहे.

वर्दीचा धाक देशात राहिला नाही

बी एम सी हॉस्पिटलमध्ये वारंवार घटना घडत आहेत,पारदर्शकपणे निर्णय प्रक्रिया करून कोणीही अत्याचार करणाऱ्या व्यक्ती असतील फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. एन्काऊंटर वगैरे करू नका व्यवस्थित काम करा अशी माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे. भर चौकात फाशी द्या सगळ्यांसमोर त्याशिवाय हा विषय संपणार नाही वर्दीचा धाक देशात राहिला नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.  

Web Title: Maharashtra has shown that invisible forces cannot do anything here Supriya Sule targets the rulers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.