HSC Result 2022 | बारावीच्या तब्बल १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 01:01 PM2022-06-09T13:01:20+5:302022-06-09T13:04:57+5:30
७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ३० हजार ७६९
पुणे : इयत्ता बारावीच्या परीक्षेत राज्यातील १० हजार ४७ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ३० हजार ७६९ आहे. तसेच ३५ व ४५ टक्क्यांच्या आता गुण मिळवणारे विद्यार्थी ७३ हजार ३१५ आहेत.
प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५ लाख ५८ हजार ६७८ आहे. द्वितीय श्रेणी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ४ लाख ९३ हजार ४४२ असून, त्यात मुंबई विभागातील सर्वाधिक १ लाख ३४ हजार २५२ विद्यार्थी आहेत.
विभागनिहाय ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी
विभाग विद्यार्थी संख्या
नागपूर १०४६
औरंगाबाद ८१०
मुंबई २७६६
कोल्हापूर ५९३
अमरावती १७८३
नाशिक ६१२
लातूर ५६३
कोकण १३८