Maharashtra | सावधान! ‘एच ३ एन २’चा धोका वाढला; पुण्यात आढळले २२ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 10:27 AM2023-03-14T10:27:39+5:302023-03-14T10:29:38+5:30

देशभरात ‘एच ३ एन २’ या विषाणूची साथ पसरलेली आहे...

Maharashtra Increased risk of influenza virus H3N2; 22 patients found in Pune | Maharashtra | सावधान! ‘एच ३ एन २’चा धोका वाढला; पुण्यात आढळले २२ रुग्ण

Maharashtra | सावधान! ‘एच ३ एन २’चा धोका वाढला; पुण्यात आढळले २२ रुग्ण

googlenewsNext

पुणे : इन्फ्लुएंझा ए विषाणूचा उपप्रकार असलेल्या ‘एच ३ एन २’ या विषाणूचे पुणे शहरात २२ रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण जानेवारी ते मार्च दरम्यान आढळले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे १९ ते ६० वयाेगटातील आहेत. साेमवारी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) याचा अहवाल दिला. यावरून शहरात या विषाणूची साथ माेठ्या प्रमाणावर पसरली असल्याचे शिक्कामाेर्तब झाले आहे. मात्र, त्याची लक्षणे ही सामान्य फ्ल्यूसारखीच असून जीवघेणी नसल्याची बाब दिलासादायक आहे.

देशभरात ‘एच ३ एन २’ या विषाणूची साथ पसरलेली आहे. पुण्यातदेखील रुग्णांना याची बाधा झाली आहे. दरम्यान, शहरात जानेवारी ते मार्च या कालावधीत नायडू हाॅस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या १०५ संशयित रुग्णांचे नमुने ‘एनआयव्ही’ला तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले हाेते. या रुग्णांच्या नमुन्यांपैकी २२ नमुन्यांचा अहवाल ‘एच ३ एन २’ साठी पॉझिटिव्ह आला आहे. या नमुन्यांची संख्या जरी कमी असली तरी ते रुग्ण केवळ नायडू हाॅस्पिटलमध्ये जे उपचारासाठी आले त्यांचे ते नमुने आहेत. उर्वरित खासगी रुग्णालयातील रुग्णांचा समावेश नाही. त्यामुळे, काेराेनासारखी ही साथ पसरली असण्याची शक्यता आहे.

आढळलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे १९ ते ६० वयाेगटातील आहेत. तर ० ते ५ वयाेगटातील एकही नाही. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी वाचा.

काय आहे एच ३ एन २ विषाणू ?

हा एक सर्वत्र आढळणाऱ्या इन्फ्लुएंझा ए व्हायरसचा ‘एच ३ एन २’ हा उपप्रकार आहे. वातावरण बदलाच्या काळात श्वसन यंत्रणेशी निगडित हा विषाणू असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) म्हटले आहे. तसेच याला ‘इन्फ्लुएंझा ए’चा विषाणू म्हणूनही ओळखले जाते.

कसे हाेते निदान?

रक्त नमुन्यांसह काही अन्य तपासण्या केल्यावर ‘एच ३ एच २’ची लागण झाली आहे की नाही ते कळू शकते. याचे निदान एनआयव्हीमध्ये हाेते.

काय आहेत लक्षणे?

- तीन ते पाच दिवस ताप राहताे.

- दाेन ते तीन आठवडे खाेकला राहताे.

- थंडी वाजते, धाप लागते, घसा खवखवताे.

- साेबतच मळमळ, उलटी ही लक्षणेदेखील आढळतात

Web Title: Maharashtra Increased risk of influenza virus H3N2; 22 patients found in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.