ऑलम्पिक वीर "खाशाबा जाधव" पुरस्काराने महाराष्ट्र केसरी बालारफि शेखचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:10 AM2021-01-18T04:10:41+5:302021-01-18T04:10:41+5:30
यामध्ये मानचिन्ह, पुस्तके, शाल, श्रीफळ व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तेव्हा याप्रसंगी हनुमान कुस्ती आखाडाचे प्रशिक्षक ...
यामध्ये मानचिन्ह, पुस्तके, शाल, श्रीफळ व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तेव्हा याप्रसंगी हनुमान कुस्ती आखाडाचे प्रशिक्षक गणेश दांगट, ध्रुवतारा फाऊंडेशनचे अध्यक्ष व क्रीडालेखक संजय दुधाणे, गोरख वांजळे, मुळशी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद माझिरे, गणेश घुले, कुस्ती प्रशिक्षक रामसिंग, उमेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. देशाचे पहिले ऑलिम्पिदक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी लेखक संजय दुधाणे यांनी खाशाबांच्या अनेक आठवणींला उजाळा दिला. प्रतिकुल परिस्थितीवर मात करून खाशाबांनी जिंकलेले पदकाची कथा त्यांनी उपस्थित कुस्तीगीरांना सांगितली. गणेश दांगट पुढे म्हणाले की,खाशाबांचा वारसदार महाराष्ट्रातून निर्माण झाला पाहिजे. तो प्रयत्न आम्ही सुरू केला आहे.
खाशाबा जाधव हे कुस्तीतच नव्हे तर अॅथलेटिक्स, कबड्डी खेळातही आणि अभ्यासातही अव्वल होते अशी माहिती सांगत राजेंद्र बांदल पुढे म्हणाले की,हनुमान आखाड्यातील राष्ट्रीय विजेत्या खेळाडूना पेरिविंकल शाळा व हिमालय पतसंस्थेकडून नेहमीच मदत दिली जाईल.
ऑलिम्पिकवीर "खाशाबा जाधव" पुरस्कार राजेंद्र बांदल यांच्या हस्ते स्वीकारताना बालारफी शेख,शेजारी डावीकडून गणेश घुले,विनोद माझिरे,संजय दुधाणे, गणेश दांगट