महाराष्ट्र केसरी चौधरी अजिंक्य
By admin | Published: April 28, 2015 11:35 PM2015-04-28T23:35:04+5:302015-04-28T23:35:04+5:30
बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आयोजित केलेल्या कुस्ती आखाड्यात महाराष्ट्र केसरी विजय चौधरी याने महाराष्ट्र केसरी समाधान घोडके याच्यावर विजय मिळवून अजिंक्यपद पटकाविले.
बारामती : बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आयोजित केलेल्या कुस्ती आखाड्यात महाराष्ट्र केसरी विजय चौधरी याने महाराष्ट्र केसरी समाधान घोडके याच्यावर विजय मिळवून अजिंक्यपद पटकाविले.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त या कुस्ती आखाड्याचे आयोजन केले होते. जानकर यांचा वाढदिवस बारामती तालुक्यातील मूकबधीर मुलांच्या शाळेत साजरा केला.
कार्यक्रमाचे आयोजन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष संदीप चोपडे यांनी केले होते. कार्यक्रमासाठी दादासाहेब केसकर, आण्णासाहेब रुपनवर, रणजित सूळ, नितिन धायगुडे, पप्पु मासाळ, संपतराव टकले, चंद्रकांत वाघमोडे, बापूराव सोलनकर, तानाजी पाथरकर, अशोक माने, पोपट धवडे, हरिष खोमणे, अमोल सातकर यांनी सहकार्य केले.
यावेळी आमदार महादेव जानकर, ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, रासपचे महासचिव बाळासाहेब दोडतल्ले, दशरथ राऊत, बाळासाहेब गावडे, नगरसेवक सुनिल सस्ते, पुणे प्रादेशिक बाजार समितीचे उपसभापती दिलीप खैरे, हनुमंतराव सुळ, बाळासाहेब तोंडे पाटील, बाळु बंडगर, पांडुरंग कचरे, नगरसेवक बबलू देशमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)
४या कुस्ती स्पर्धेत पहिल्या लढतीत महाराष्ट्र केसरी विजय चौधरी ३ लाख ११ हजार १११ रुपये पारितोषिक पटकवले. दुसरी लढत महाराष्ट्र चॅम्पियन नंदू आबदार व राजेंद्र राजमाने यांच्यात झाली. त्यामध्ये नंदू आबदार यांनी विजय संपादन करून २ लाख ११ हजार १११ रुपये द्वितीय पारितोषिक मिळवले. तिसऱ्या लढतीमध्ये पै. भारत मदने व विजय पाटील यांच्यामधील लढत बरोबरीत सुटली. यांचे बक्षीस १ लाख ११ हजार १११ रुपये देण्यात आले. चौथी लढत राजेंद्र सुळ व संग्राम पाटील यांची लढत बरोबरीत सुटली. पाचवी लढत नितिन केचे व मारुती जाधव यांच्यामध्ये नितिन केचे विजयी झाला. सहावी लढत विलास डोईफोडे विरुद्ध देवीदास घोडके यामध्ये विलास डोईफोडे विजयी झाला. अशा प्रमुख लढतीबरोबर छोट्या मोठ्या १११ लढती झाल्या.