Maharashtra lockdown: पुण्यात दुकाने उघडायला परवानगी द्या व्यापाऱ्यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 04:11 PM2021-05-31T16:11:37+5:302021-05-31T16:13:26+5:30
व्यापाऱ्यांचे लसीकरण प्राधान्याने करण्याची देखील मागणी. सकारात्मक आदेश काढण्याचे आयुक्तांचे आश्वासन
शासनाचा नवीन आदेशाचा अधीन राहून दुकाने उघडायला परवानगी द्यावी अशी मागणी पुण्यातील व्यापारी महासंघाने केली आहे. आज सकाळी पुणे म.न.पा.आयुक्त मा .श्री.विक्रमकुमार व सह आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल यांची आयुक्तांच्या कार्यालयात पुणे शहरातील दुकाने उघडण्या संदर्भात घेतली. त्यावेळी ही मागणी करण्यात आली आहे. याबरोबरच पुण्यातील सर्व व्यापाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण केले जावे अशी मागणी देखील पुणे जिल्हा रीटेलर्स असोसिएशन चा वतीने करण्यात आली आहे.
शासनाच्या नवीन नियमावलीत नमूद केल्यानुसार १० टक्क्यांपेक्षा पोझीटीव्हीटी रेट कमी असणर्या जिल्ह्यांना दिलासा देण्यात येणार आहे. इथली दुकाने दुपारी २ पर्यंत सुरू ठेवायला आता परवानगी देण्यात येणार आहे.
पुणे मनपा हद्दीत कोरोना बाधितांचे गेल्या आठवडाभरातील बाधितांचे सरासरी प्रमाण १० टक्के पेक्षा कमी असून रुग्णालयामध्ये ७६ टक्के ऑक्सिजन च्या खाटा रिकाम्या आहेत .त्यानुसार निर्भेद शिथिल करून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी पुणे व्यापारी महासंघातर्फे करण्यात आली.
यावर आयुक्तांनी मागील दोन महिन्याच्या काळात व्यापाऱ्यांनी चांगले सहकार्य केले असून यापुढेही व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे,नवीन आदेश काढताना सकारात्मक विचार करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
सुधारित आदेश आज संध्याकाळ पर्यंत काढण्यात येतील त्यानंतर सर्व काही स्पष्ट होईल.या प्रसंगी पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेहचंद रांका व सचिव महेंद्र पितळीया उपस्थित होते.
एकीकडे दुकाने उघडायची मागणी करतानाच आता पुणे जिल्हा रिटेलर असोसिएशन कडून व्यापाऱ्यांचे प्रधानाने लसीकरण केले जावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांना याबाबत अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी निवेदन दिले आहे.