Maharashtra Lockdown : राज्य सरकारच्या टाळेबंदीच्या निर्णयात संदिग्धता; औद्योगिक क्षेत्राला सविस्तर नियमावलीची प्रतीक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 04:06 PM2021-04-14T16:06:22+5:302021-04-14T16:06:49+5:30

राज्य सरकारने जाहीर केलेल्या टाळेबंदीच्या निर्बंधाबाबत निर्माण झालेला गोंधळ दूर होणे देखील गरजेचे आहे.

Maharashtra Lockdown : Ambiguity in the state government’s lockout decision; Awaiting detailed regulations for the industrial sector | Maharashtra Lockdown : राज्य सरकारच्या टाळेबंदीच्या निर्णयात संदिग्धता; औद्योगिक क्षेत्राला सविस्तर नियमावलीची प्रतीक्षा 

Maharashtra Lockdown : राज्य सरकारच्या टाळेबंदीच्या निर्णयात संदिग्धता; औद्योगिक क्षेत्राला सविस्तर नियमावलीची प्रतीक्षा 

Next

पिंपरी : कोरोनाचा (कोविड १९) प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून पंधरा दिवसांची टाळेबंदी जाहीर केली आहे. त्यात संदिग्धता असल्याची प्रतिक्रिया औद्योगिक सह विविध क्षेत्रातून येत आहे. तसेच टाळेबंदी निर्बंधाबाबत निर्माण झालेला गोंधळ दूर होणे देखील गरजेचे आहे. मात्र, कालच्या टाळेबंदीच्या निर्णयावर आज रात्री सविस्तर आदेश जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार स्पष्ट आदेश देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. सौरभ राव यांनी दिली आहे. 

राज्य सरकारने पंधरा दिवसांची टाळेबंदी जाहीर केली आहे. त्यात संदिग्धता असल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (एमसीसीआयएने) वेबिनार आयोजित केला होता. त्यात विभागीय आयुक्त राव बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, उद्योग विभागाचे सह संचालक सदाशिव सुरवसे, अविनाश हदगल, एमसीसीआयएचे अध्यक्ष सुधीर मेहता, महासंचालक प्रशांत गिरबने यावेळी उपस्थित होते. 

विभागीय आयुक्त राव म्हणाले, उद्योगांवर उगाचच कोणतेही निर्बंध घातले जाणार नाहीत. कोरोना नियमांचे पालन केल्यास बाधितांचा आकडा निश्चितच खाली येईल. मात्र, ते आपण किती निर्बंध पाळतो त्यावर अवलंबून आहे. निर्बंध पाळले न गेल्यास नाईलाजाने टाळेबंदीचा कालावधी वाढविला जाऊ शकतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आपल्या घराचा उंबरठा केव्हाच ओलांडला आहे. त्यामुळे प्रत्येकाने नियमांचे प्रामाणिकपणे पालन करावे. 

जीवनावश्यक वस्तू आणि सेवा अबाधित राहतील. तसेच त्यांना पुरवठा करणारी उत्पादन साखळी सुरळीत राहील. गेल्या वर्षीच्या टाळेबंदी मार्गदर्शक सुचनेत निर्यात केल्या जाणाऱ्या उत्पादनांचा समावेश नव्हता. निर्यात केले जाणारे उद्योग सुरू राहील याची काळजी घेतली जाईल. तसेच जीवनावश्यक वस्तू आणि निर्यात करणारे उद्योग आणि त्यांची उत्पादन साखळी अबाधित राहील.

कोरोना नियमांचे पालन करून कामावर येणाऱ्या कोणत्याही कामगारांची आणि पुरवठादारांची अडवणूक होणार नाही. औषध, शेतमाल आणि शेतमाल प्रक्रिया उद्योग, डेअरी, फोर्जिंग, स्टील, पेंट उद्योग सुरू राहतील. तसेच त्यांना पुरवठा करणारी पुरवठा करणारी उत्पादन साखळी अबाधित राहील. तसेच निर्यातक्षम उद्योग सुरु राहतील असेही राव यांनी यावेळी स्पष्ट केले. 

पुण्यामध्ये ऑटो उद्योग मोठ्या प्रमाणावर असून, त्यांचे निर्यातीचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे हा उद्योग सुरू राहील. कामगारांना कामावर करण्यासाठी अडचण येणार नाही. त्यांचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल, असे उद्योग सहसंचालक सुरवसे म्हणाले.  

टाळेबंदी निर्बंधाबाबत निर्माण झालेला गोंधळ दूर व्हावा. नियमांचे पालन करणे सोयीचे जावे यासाठी संभ्रम दूर करण्याचे आवाहन मेहता यांनी केले. तर, पुण्यातून दरमहा पाच ते सहा हजार कोटी रुपयांचा माल निर्यात होतो याकडे प्रशांत गिरबने यांनी लक्ष वेधले.

सुधीर मेहता चेअरमन एमसीसीआयए म्हणाले,"बऱ्याच इंडस्ट्रीजवर परिणाम होईल अशी चिन्ह आहेत. आत्ता फक्त शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या ,तसेच डेअरी इंडस्ट्री आणि कन्ट्यिन्यु प्रोसेस इंडस्ट्रीला परवानगी आहे असं म्हणलेलं आहे. अर्थात आम्ही अजुन पूर्ण नियमावली यायची वाट पाहत आहोत."

Web Title: Maharashtra Lockdown : Ambiguity in the state government’s lockout decision; Awaiting detailed regulations for the industrial sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.