Maharashtra Lockdown : राज्य सरकारकडून प्रवासासाठी पुन्हा एकदा 'ई-पास'; पहिल्याच दिवशी पुण्यात २ हजारांवर अर्ज विनंती अर्ज  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 08:01 PM2021-04-23T20:01:41+5:302021-04-23T20:02:19+5:30

पोलीस आयुक्त कार्यालय येथे डिजीटल कक्ष कार्यान्वित

Maharashtra Lockdown : ‘E-pass’ once again for travel from the state government; On the first day in Pune, over 2,000 applications were submitted | Maharashtra Lockdown : राज्य सरकारकडून प्रवासासाठी पुन्हा एकदा 'ई-पास'; पहिल्याच दिवशी पुण्यात २ हजारांवर अर्ज विनंती अर्ज  

Maharashtra Lockdown : राज्य सरकारकडून प्रवासासाठी पुन्हा एकदा 'ई-पास'; पहिल्याच दिवशी पुण्यात २ हजारांवर अर्ज विनंती अर्ज  

Next

 पुणे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने ’ब्रेक दि चेन’अंतर्गत असणारे निर्बंध अधिक कडक केले असून, प्रवासावर देखील कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. हे नियम 1 मे पर्यंत लागू करण्यात आले आहेत. या दरम्यान राज्यातील जनतेची गैरसोय होऊ नये याकरिता राज्य शासनाने एका जिल्हयातून दुस-या जिल्ह्यात तसेच पुणे शहरातून इतर जिल्हयात जाण्याकरिता https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळावर ’ई-पास’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पुण्यातील पोलीस आयुक्त कार्यालय येथे शुक्रवार (दि.23) पासून शहर पोलीस दलांकडून ई- पास देण्याकरिता डिजीटल कक्ष’ सुरू करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 2077 इतके विनंती अर्ज ई-पास साठी क्षाकडे प्राप्त झाले असून, त्यापैकी 286 नागरिकांना डिजीटल पास देण्यात आले आहेत तर 375 नागरिकांची आवश्यक कागदपत्रे नसल्याने नाकारण्यात आले आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हा डिजीटल कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या डिजीटल कक्षामध्ये 1 पोलीस निरीक्षक, 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 2 पोलीस उपनिरीक्षक आणि 20 पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे. नागरिकांना काही महत्त्वाच्या कारणांसाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास नागरिकांनी ई- पासचा वापर करावा, असे आवाहन राज्यातील पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जाणून घ्या कसा काढावा ई-पास
* ई- पास मिळवण्यासाठी https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.
*  त्यानंतर 'apply for pass here'   या पयार्यावर क्लिक करा.
* ज्या जिल्ह्यात प्रवास करायचा आहे, तो जिल्हा निवडावा.
* आवश्यक कागदपत्र जोडावीत.
* प्रवास करण्यासाठीचे अत्यावश्यक कारणही तेथे नमूद करावे लागेल.
* कागदपत्रे अपलोड करताना सर्व माहिती तपशील एकाच डॉक्युमेंटमध्ये घेऊन
तो अपलोड करावा.
* अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी देण्यात येईल. तो सेव्ह करावा,
त्यावरून अर्ज नेमका कोणत्या प्रक्रियेत आहे हे तुम्ही जाणू शकता.
थोडक्यात या माध्यमातून तुम्हाला अजार्चं स्टेटस तपासता येईल.
* पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही तोच टोकन
आयडी वापरुन इ- पास डाऊनलोड करु शकता.
*ई- पासमध्ये तुमची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासची वैधता कालावधी आणि
क्यूआर कोड असेल.
* प्रवास करतेवेळी पासची मूळ प्रत आणि त्याची सॉफ्ट कॉपीही सोबत ठेवा.
जेणेकरुन पोलिसांनी विचारल्यानंतर पास दाखविता येऊ शकेल.
----------------------------------------------
कुणाला मिळू शकतो ई-पास
*अतिशय जवळच्या व्यक्तीचा विवाहसोहळा, एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी आणि
अत्यावश्यक आरोग्य आणीबाणी या कारणांसाठी ई-पास मिळवता येऊ शकतो.
*अत्यावश्यक सेवांतील कर्मचा-्यांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत
प्रवासासाठी ई- पासची आवश्यकता नाही.
*व्यावसायिक कारणांसाठी परवानगी देण्यात येणार नाही.
*विमान प्रवास करणा-या नागरिकांना प्रवास करण्याकरिता डिजी़टल पास देण्यात येईल.
* ज्यांना ऑनलाईन सेवेसाठीचा अ‍ॅक्सेस मिळत नाही, अशा व्यक्तींनी सदर
प्रक्रियेसाठी नजीकच्या पोलीस स्थानकाला भेट द्यावी. जिथे त्यांची मदत
केली जाईल.
---------------------------------------------------------------------------------

Web Title: Maharashtra Lockdown : ‘E-pass’ once again for travel from the state government; On the first day in Pune, over 2,000 applications were submitted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.