महाराष्ट्राचा आंध्र प्रदेशविरुद्ध ४५ धावांनी पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:10 AM2021-03-19T04:10:57+5:302021-03-19T04:10:57+5:30

जयपूरमध्ये के. एल. सैनी स्टेडियमवर हा सामना झाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आंध्र प्रदेशने ५० षटकांत ३ बाद ...

Maharashtra lost by 45 runs against Andhra Pradesh | महाराष्ट्राचा आंध्र प्रदेशविरुद्ध ४५ धावांनी पराभव

महाराष्ट्राचा आंध्र प्रदेशविरुद्ध ४५ धावांनी पराभव

googlenewsNext

जयपूरमध्ये के. एल. सैनी स्टेडियमवर हा सामना झाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आंध्र प्रदेशने ५० षटकांत ३ बाद २३० धावा केल्या. महाराष्ट्राला ४८.२ षटकांत १८५ धावांवर रोखून आंध्र प्रदेशने विजय साकारला. झांसी लक्ष्मीने १२३ चेंडूंत सहा चौकारांसह ८० धावा आणि ३४ धावांत तीन गडी बाद करत आंध्र प्रदेशच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. एन. अनुषा आणि झांसी यांनी १०९ धावांची सलामी देत आंध्र प्रदेशला भक्कम सुरुवात करून दिली. एन. अनुषा बाद झाल्याने ही भागीदारी संपुष्टात आली. एन. अनुषाने ८४ चेंडूंत आठ चौकारांसह ६६ धावा केल्या. त्यानंतर झांसी लक्ष्मी (८०), पुष्पा लता (१९), पद्मजा (नाबाद ३२), सुधारानी (नाबाद २६) यांनी आंध्र प्रदेशला २३० पर्यंत नेले. महाराष्ट्राकडून प्रियांका घोडके हिने एक बळी घेतला.

आव्हानाचा पाठलाग करताना महाराष्ट्राच्या सलामीवीर ऋतुजा देशमुख (१०), मुक्ता मगरे (१७) झटपट बाद झाल्या. त्यानंतर अनुजा पाटील (२), शिवाली शिंदे (७) झटपट बाद झाल्याने महाराष्ट्राची अवस्था चार बाद ३९ अशी झाली. त्यानंतर आदिती गायकवाड (३३), सायली लोणकर (६०) यांनी महाराष्ट्राकडून झुंज देण्याचा प्रयत्न केला. दोघीही बाद झाल्यानंतर माया सोनावणे (१५), उत्कर्षा पवार (१६) यांनाच दोन अंकी धावा करता आल्या. १८५ धावांवर महाराष्ट्राचा डाव संपुष्टात आला. आंध्र प्रदेशकडून झांसी लक्ष्मी (३-३४), चंद्रा लेखा (२-३२), पद्मजा (२-१९), के. ज्योती (२-३१) यांनी प्रभावी गोलंदाजी केली.

धावफलक : आंध्र प्रदेश - ५० षटकांत तीन बाद २३०. एन. अनुषा (६६), झांसी लक्ष्मी (८८), पुष्पा लता (१९), पद्मजा (नाबाद ३२), सुधाराणी (नाबाद २६). गोलंदाजी - प्रियांका घोडके ८-०-३७-१, अनुजा पाटील १०-३-२९-०, प्रियांका गारखेडे ६-१-३१-०, मुक्ता मगरे ८-१-३१-०.

महाराष्ट्र - ४८.२ षटकांत सर्वबाद १८५. सायली लोणकर (६०), आदिती गायकवाड (३३), मुक्ता मगरे (१७), उत्कर्षा पवार (नाबाद १६).

गोलंदाजी - झांसी लक्ष्मी ८.२-०-३४-३, ज्योती ९-१-३१-२, पद्मजा ९-२-१९-२, चंद्र लेखा ८-२-३२-२.

Web Title: Maharashtra lost by 45 runs against Andhra Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.