महाराष्ट्र मंडळ, टेनिसनट्स रॉजर उपांत्यपूर्व फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:11 AM2021-03-16T04:11:26+5:302021-03-16T04:11:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए)तर्फे आयोजित तिसऱ्या कुडो ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए)तर्फे आयोजित तिसऱ्या कुडो इंडिया सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत साखळी फेरीत सोलारिस आरपीटीए, महाराष्ट्र मंडळ, सोलारिस गोगेटर्स आणि टेनिसनट्स रॉजर या संघानी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे आठवड्याच्या दर शनिवार व रविवार या दिवशी सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत अ गटात जयंत पवार, हेमंत भोसले, रवींद्र पांडे, योगेश आहेर, अन्वित पाठक, सिधू भरमगोंडे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर सोलारिस गोगेटर्स संघाने अर्ली बड्स संघाचा पराभव केला. फ गटात महाराष्ट्र मंडळ संघाने मॉन्टव्हर्ट संघाचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. विजयी संघाकडून कमलेश शहा, अमित शर्मा, संजय सेठी, अर्पित श्रॉफ, धरणीधर मिश्रा, निशांत मिस्त्री, अभिषेक चव्हाण, राजेंद्र देशमुख यांनी अफलातून कामगिरी केली. दुसऱ्या सामन्यात टेनिसनट्स रॉजर संघाने पीसीएलटीए संघाचा तर, सोलारिस गोगेटर्स संघाने एस संघाचा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल :
गटसाखळी फेरी : गट अ : सोलारिस आरपीटीए वि.वि.अर्ली बड्स १७-१३
१०० अधिक गट : रवींद्र कात्रे-संजीव घोलप पराभूत वि. रमेश पाटणकर-केदार पाटील १-६,
९० अधिक गट : जयंत पवार-हेमंत भोसले वि.वि. किशोर स्वामी-राहुल करणे ६-१,
खुला गट : रवींद्र पांडे-योगेश आहेर वि.वि. राजीव खरे-साकेत गोडबोले ६-०,
खुला गट : अन्वित पाठक-सिधू भरमगोंडे वि.वि. रमेश पाटणकर-मंदार जग्यान ६-३,
गट फ : महाराष्ट्र मंडळ वि.वि. मॉन्टव्हर्ट : २४-६,
१०० अधिक गट : कमलेश शहा-अमित शर्मा वि.वि. जॉर्ज वरघसे-नटराजन ६-०,
९० अधिक गट : संजय सेठी-अर्पित श्रॉफ वि.वि. श्रीकांत नारकर-सचिन भास्करन ६-१,
खुला गट : धरणीधर मिश्रा-निशांत मिस्त्री वि.वि. गिरीश कुकरेजा-सचिन माधव ६-२,
खुला गट : अभिषेक चव्हाण-राजेंद्र देशमुख वि.वि. जॉर्ज वरघसे-सोमनाथ पवार ६-३,
गट फ : टेनिसनट्स रॉजर वि.वि.पीसीएलटीए : १९-११
१०० अधिक गट : रवी कोठारी-अनिल कोठारी वि.वि. रवी जौकनी-गिरीश कुलकर्णी ६-०,
९० अधिक गट : सुधीर पिसाळ-कानन राघवन पराभूत वि. डॉ. राजेश मित्तल-कल्पेश मकणी १-६,
खुला गट : अरुण भोसले-वेंकटेश आचार्य पुढे चाल वि.नंदू रोकडे-विशाल साळवी ६-०,
खुला गट : भूषण सरदेसाई-नितीन सावंत वि.वि. रवी जौकनी-अनंत गुप्ता ६-३,
गट क : सोलारिस गोगेटर्स वि.वि. एस १७-१६,
१०० अधिक गट : स्वरूप सावनूर-सुबोध पेठे पराभूत वि.राहुल सिंह-संजय आशेर २-६,
९० अधिक गट : आशिष कुबेर-अमोल गायकवाड वि.वि. प्रणिल बाडकर-पार्थ मोहापात्रा ६-२,
खुला गट : महेंद्र गोडबोले-सचिन खिलारे पराभूत वि. सुनील लुल्ला-प्रफुल नागवाणी ३-६,
खुला गट : शिव जावडेकर-अश्विन हळदणकर वि.वि. सुनील क्रिश-जोसेफ सानू ६-२,