महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशन होणार बेघर

By admin | Published: June 7, 2016 09:09 PM2016-06-07T21:09:49+5:302016-06-07T21:09:49+5:30

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशन (एमओए)वर बेघर होण्याची वेळ आली आहे.

Maharashtra Olympic Association will be homeless | महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशन होणार बेघर

महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशन होणार बेघर

Next

शिवाजी गोरे, पुणे
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशन (एमओए)वर बेघर होण्याची वेळ आली आहे. सध्या संघटनेचे कार्यालय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालकीच्या अण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये असून, ते धोकादायक बनले असल्याचा अहवाल पिंपरी-चिंचवड महापालिका फ क्षेत्रीय कार्यालयाने दिल्यामुळे कार्यालय मोकळे करण्याची नोटीस संघटनेला देण्यात आली आहे.
तर, दुसरीकडे एमओएने राज्याच्या क्रीडा विभागाला शिवछत्रपती क्रीडासंकुलात कार्यालयासाठी जागा देण्याबाबत जानेवारी महिन्यात मागणी अर्ज केला असून, त्या पत्राला क्रीडा विभागाने केराची टोपली दाखविली. अद्याप जागा देण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे कार्यालय कुठे करायचे, हा प्रश्न संघटनेला पडला आहे. सत्ताबदल होताच, संघटनेला डावलण्याचे कारस्थान सुरू असल्याची चर्चा राज्याच्या क्रीडाक्षेत्रात रंगली आहे.
पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमचे बांधकाम ३७ वर्षांपूर्वी म्हणजे १९७९मध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून त्याची पाहणी एप्रिल महिन्यात करण्यात आली. ही पाहणी वास्तुविशारदाकडून करण्यात आली आहे. त्यांनी त्यांचा अहवाल ३ जून २०१५ रोजी पीसीएमसीकडे सादर केला आहे.
या अहवालात मगर स्टेडियमची डागडुजी ताबडतोब करण्यात यावी. कारण हे बांघकाम जुने झाले अजून केव्हाही काहीही होऊ शकते. त्या स्टेडियमचे स्लॅब, पिलर, छत, भिंती या सर्व कमकुवत झाल्या आहेत. या बांधकामाचे आयुष्य संपलेले आहे. त्यामुळे त्याचे लवकरात लवकर नूतनीकरण करणे आवश्यक आहे. अन्यथा, मोठी हाणी हाऊ शकते. कारण तेथे काही कार्यालयेसुद्धा आहेत. आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमओएच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलात पाहणी करून एमओएच्या कार्यालयासाठी जागासुद्धा निश्चित केली होती. त्या वेळी आर्किटेक्टला बोलावून त्यांच्यामार्फत प्लॅनसुद्धा तयार करण्यात आला होता. पण, आघाडी सरकार जाऊन युती सरकार आल्यानंतर क्रीडासंकुलात एमओएचे कार्यालय बांधण्याच्या नियोजनाला युती सरकारने खो देत असल्याचे बोलले जात आहे.

क्रीडा खात्याकडे एमओएने शिवछत्रपती क्रीडासंकुलात कार्यालयासाठी जागा मिळावी म्हणून जानेवारी महिन्यात पत्रव्यवहार केलेला आहे. त्याचे उत्तर अजूनपर्यंत मिळालेले नाही. या संदर्भात क्रीडा खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबरसुद्धा चर्चा झालेली आहे; पण पुढे कोणतीच हालचाल झालेली नाही. पीसीएमसीकडून एमओएला कार्यालय मोकळे करण्याची नोटीससुद्धा मिळालेली आहे. मी रविवारी आमचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना याची माहिती दिली आहे. त्यांना ‘क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्याशू चर्चा करतो,’ असे सांगितले.
-बाळासाहेब लांडगे, सरचिटणीस, एमओए

महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेचा कार्यालयासाठी जागा मिळण्याबाबतचा अर्ज क्रीडा खात्याला मिळलेला आहे. असे महत्त्वाचे निर्णय मंत्रालयात होतात. आम्ही त्यांचा अर्ज सचिवांकडे पूर्वीच पाठविला आहे. मंत्रालयातून अजून काही त्याचे उत्तर आलेले नाही.
- नरेंद्र सोपल, सहसंचालक, क्रीडा विभाग

Web Title: Maharashtra Olympic Association will be homeless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.