"बाहेरच्या पक्षातून आमच्याकडे आलेल्यांना..."; चाकणकरांनी रुपाली पाटील ठोंबरेंना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 11:30 AM2024-10-17T11:30:36+5:302024-10-17T11:36:04+5:30

Rupali Chakankar : रुपाली चाकणकर यांना पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद दिले आहे.

maharashtra politics Rupali Chakankar replied to Rupali Patil Thombare | "बाहेरच्या पक्षातून आमच्याकडे आलेल्यांना..."; चाकणकरांनी रुपाली पाटील ठोंबरेंना सुनावलं

"बाहेरच्या पक्षातून आमच्याकडे आलेल्यांना..."; चाकणकरांनी रुपाली पाटील ठोंबरेंना सुनावलं

Rupali Chakankar ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यानंतर आता चाकणकर यांना पक्षातूनच विरोध सुरू झाला आहे. त्यांच्या निवडीने पक्षातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एक व्यक्ती एक पद नियमानुसार रुपाली चाकणकर यांच्याकडील महिला प्रदेशाध्यक्षपद काढून घ्या, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे. यावरुन आता रुपाली चाकरणकर यांनी ठोंबरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

न्यायमूर्ती संजीव खन्ना होणार देशाचे ५१ वे सरन्यायाधीश; इलेक्टोरल बॉण्ड्सपासून VVPAT पर्यंत घेतलेत महत्त्वाचे निर्णय

"एक व्यक्ती म्हणजे पक्ष नाही आणि बाहेरच्या पक्षातून आमच्या पक्षात आलेल्या व्यक्तींना पक्षाची वैचारिक भूमिका माहित नाही, पक्षाची ध्येय धोरण माहित नाहीत. त्यामुळे सातत्याने एकच व्यक्ती टीका करत असेल तर समजून जावं की मानसिकता काय आहे, मला ते फार महत्वाच वाटत नाही, असं प्रत्युत्तर रुपाली चाकणकर यांनी रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिले. 

"राज्यभर काम करत असताना राज्यात संघटना उभी केली. आयोगाचं काम करत असताना आयोगातील काम केलं आहे, त्यामुळे अशा व्यक्तींवर बोलण मला फार उचित वाटत नाही. माझा आनंदाचा क्षण आहे, पक्षाने दिलेली जबाबदारी मी पेलली, हा विश्वास पक्षाला वाटला म्हणून पक्षाने मला दिली, याबद्दल पक्षाचे आभार, असंही रुपाली चाकरणकर म्हणाल्या. 

काही दिवसापूर्वीही रुपाली पाटील ठोंबरे आणि रुपाली चाकरणकर यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले होते. तर आता चाकणकर यांना पुन्हा एकदा आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. काल पुण शहरचे अध्यक्ष दीपक मानकर यांनीही नाराजी व्यक्त केली. काल त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, यावेळी त्यांनी पक्षाला राजीनामा देणार असल्याचे जाहीर करत उघड-उघड नाराजी व्यक्त केली.

दीपक मानकरांनी नाराजी व्यक्त केली

"एवढी तत्परता जर आमचे अध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याकडे आहे की, रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष पहिलं पद त्यांचं जाहीर केलं. त्यांच्यानंतर विधान परिषदेची यादी जाहीर केली. मग तुम्ही तेवढी तत्परता आमच्यासाठी का दाखवली नाही? असा सवालही मानकर यांनी केला. तुम्ही आम्हाला फोन करायचीही तत्परता दाखवली नाही. तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांना विचारायला तरी पाहिजे. संघटना चालवायची असेल तर कार्यकर्त्यांना विचारलं पाहिजे. कार्यकर्त्यांना संघटनेत कधी न्याय मिळणार आहे. छगन भुजबळ यांच्याकडेच सगळच देणार असाल तर तुमच्या कार्यकर्त्यांना कधी ताकद देणार, ताकद दिली नाही तर कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होते, असंही दीपक मानकर म्हणाले. 

Web Title: maharashtra politics Rupali Chakankar replied to Rupali Patil Thombare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.