महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला अखेर मिळाली हक्काची जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 05:15 AM2018-08-09T05:15:01+5:302018-08-09T05:15:36+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कामकाज ६७ वर्षांपासून ३ वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या भाड्याच्या जागेतून चालत होते.
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कामकाज ६७ वर्षांपासून ३ वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या भाड्याच्या जागेतून चालत होते. अखेर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आयोगाला नवी मुंबईत हक्काचा ५ हजार ५०० चौरस मीटरचा भूखंड देण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालयासाठी शिफारस करण्यात आलेल्या जागांपैकी सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथील कोकण भवनच्या शेजारील प्लॉट क्र. ७, सेक्टर १० येथील ५ हजार ५०० चौरस मीटर भूखंड मंजूर करण्यात आल्याचे आदेश बुधवारी काढण्यात आले.
तसेच शेजारील २५०० चौरस मीटर जागा केंद्र शासनाच्या मिनिस्ट्री आॅफ रोड ट्रान्सपोर्ट अॅन्ड हायवेज यांच्या कार्यालयासाठी देण्यात
आली आहे.